नांदेड ; प्रतिनिधी
कडाक्याची थंडी पडत असल्यामुळे रस्त्यावर कुडकुडत झोपलेल्या निराधारांना धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या संकल्पनेतून लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे ” मायेचा ऊब ” या उपक्रमांतर्गत पहिल्या रात्री सहा तासात तब्बल सहाशे ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
नगीना घाट येथे नांदेड भूषण संतबाबा
बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते “मायेची ऊब” च्या वाहनाची पूजा करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रथम उपप्रांतपाल लॉ. दिलीप मोदी हे होते. भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, गॅट एरिया लीडर लॉ. जयेश ठक्कर, झोन चेअरमन लॉ. योगेश जैस्वाल आणि लॉ. विजय भारतीया, जीएसटी कॉर्डिनेटर लॉ.गौरव भारतीया, नांदेड लॉयन्सचे अध्यक्ष
लॉ. दीपक रंगगानी, लॉयन्स सफायरचे लॉ. रविंद्र औंढेकर, सेंट्रल चे सेक्रेटरी लॉ. ॲड. उमेश मेगदे , भाजयुमो माजी अध्यक्ष दिलीपसिंघ सोडी, भाजप उपाध्यक्ष परमवीरसिंघ मल्होत्रा यांच्या हस्ते थंडीत कुडकुडत झोपलेल्या निराधारांना ब्लॅंकेट पांघरण्यात आले . लॉयन्स सेंट्रलचे अध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल यांनी गोविंद उत्तरवार,रितेश तेहरा यांच्यासह सर्व ब्लॅंकेट दात्यांचा सिरोपाव आणि मोत्याची माळ टाकून सन्मान केला.बाबाजींच्या हस्ते सर्व माध्यम प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक करताना दिलीप ठाकूर यांनी असे सांगितले की, एकदा रात्री दीड वाजता घरी परत येत असताना थंडीत गोरठलेल्या वेडसर इसमाला पाहून सत्कारात मिळालेली शाल त्याच्या अंगावर पांघरली. पण तरीदेखील त्याचे कुडकुडणे सुरू असल्यामुळे ब्लॅंकेट देण्याचे ठरवले. प्रवीण साले यांनी आपल्या भाषणातून दिलीप ठाकूर यांच्या कल्पकतेचे तोंडभरून कौतुक केले.
दिलीप मोदी, जयेश ठक्कर, सीए गौरव भारतीया यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. रात्री साडेनऊ वाजता नगीना घाट येथून सुरुवात करून जुना मोंढा, शनी मंदिर, गणपती मंदिर, बंदा घाट, हनुमान पेठ, गांधी पुतळा, शिवाजी पुतळा, कोर्ट परिसर तसेच रेल्वे स्टेशनवर उघड्यावर झोपलेल्या निराधारांना ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम सकाळी साडेतीन वाजेपर्यंत चालला .शहरातील राजेशसिंह ठाकूर, कैलास महाराज वैष्णव, राहुल तेलंग, दिगंबर रुमणे,आवेस बेग ,संतोष भारती यांनी परिश्रम घेतले. नूतन वर्ष 2021 असल्यामुळे संकल्पपूर्तीसाठी आणखी 800 बँकेची आवश्यकता असल्यामुळे नागरिकांनी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन
लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे करण्यात आले आहे.
(छाया करणसिंह बैस)