नांदेड – येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने तालुक्यातील खुरगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कविसंमेलनाचे आयोजन ६ डिसेंबर रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता करण्यात आले असल्याची माहिती साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष अनुरत्न वाघमारे यांनी दिली.
खुरगाव- नांदुसा येथे आकार घेत असलेल्या श्रामणेर प्रशिक्षण केंद्रात नांदेड आणि परिसरातील कवी कवयित्रींचे कविसंमेलन होणार असून त्यात नागोराव डोंगरे, पांडूरंग कोकुलवार, गंगाधर ढवळे, कैलास धुतराज, मारोती कदम, शंकर गच्चे, प्रशांत गवळे, बाबुराव पाईकराव, रुपाली वैद्य वागरे, उषाताई ठाकूर, रणजीत, गोणारकर, एकनाथ कारलेकर, थोरात बंधू, आ.ग. ढवळे, निवृत्ती लोणे, दयानंद खिल्लारे, सुनील नरवाडे, एम.एस. गव्हाणे, दु.मो.लोणे, गजानन देवकर, संजय स्वामी आदी कवी कवयित्री तथा गायक मंडळी सहभागी होणार आहेत. सदरील कविसंमेलन खुले कविसंमेलन असून नांदेड आणि परिसरातील कवी कवयित्रींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन ऋषिपठण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भंते पंय्याबोधी थेरो यांनी केले आहे.