एक डिसेंबरचे विक्रमी मतदान

राज्यातील विधानपरिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक मतदारसंघासाठी आणि एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी मतदान झालं. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झालं आहे. तीन डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. कोरोनाच्या सावटाखाली या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया झाली. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सर्व तयारी करण्यात आली होती. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी मतदान मंगळवारी पार पडले. पुणे विभाग पदवीधर मतदार संघात पाच जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यातील कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान ( ६८.०९ टक्के) झाले. तर पुणे जिल्ह्यात सर्वात कमी (४४.९५ टक्के) मतदान झाले. दिवसभरात एकूण मतदान ५७.९६ टक्के झाले. २ लाख ४७हजार ५० पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अमरावती विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी मंगळवारी झालेल्या निवडणुकीत विभागात आतापर्यंतचे विक्रमी असे अंदाजे ८२.९१ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक विभागाने सांगितले. मतदानाच्या वाढलेल्या टक्क्यांची कारणमीमांसा वेगवेगळी केली जात असली तरी लढतीतील उमेदवारांचे हृदयाचे ठोके यामुळे वाढले आहेत. मतदानाचा वाढलेला टक्का कुणाच्या पथ्यावर पडणार, हे गुरुवारच्या मतमोजणीअंती स्पष्ट होणार आहे. अमरावती विभागातील ७७ केंद्रांवर ३५,६२२ पैकी २१,८६५ पुरुष व ७,६६९ महिला अशा एकूण २९,५३४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावित रिंगणातील २७ उमेदवारांना पसंतिक्रम दिला. त्यासाठी मंगळवारी सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. पहिल्या टप्यात सकाळी १० पर्यंत मतदानाची टक्केवारी १०.११ होती. ३६०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी १२ पर्यंत ८९४५ मतदान व २५.११ टक्केवारी झाली. यावेळी मतदान केंद्रांवर मतदानासाठी मोठ्या रांगा असल्याने टक्का वाढणार, हे निश्चित झाले.शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात एकूण ३० हजार ८६९ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ८६.७३ आहे. धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी ५ वाजेपर्यंत ४३७ पैकी ४३४ (९९.३१ %) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

पुणे (एकूण – दिवसभरात झालेले मतदान),पुरुष – 89626 – 42781,महिला – 46958 – 18621,तृतीयपंथी – 27 – 2,एकूण – 136611 – 61404 (44.95 टक्के).सातारा (एकूण – दिवसभरात झालेले मतदान) पुरुष – 39397 – 24966,महिला – 19673 – 9455, तृतीयपंथी – 1 – 0
एकूण – 59071 – 34421 (58.27 टक्के). सांगली (एकूण – दिवसभरात झालेले मतदान),पुरुष – 57569 – 39549
महिला – 29661 – 17194, तृतीयपंथी – 3 – 0
एकूण – 87233 – 56743 (65.05 टक्के), सोलापूर (एकूण – दिवसभरात झालेले मतदान), पुरुष – 42070 – 27285, महिला – 11742 – 6235, तृतीयपंथी – 1 – 0
एकूण – 53813 – 33520 (62.29 टक्के), कोल्हापूर (एकूण – दिवसभरात झालेले मतदान), पुरुष – 62709 – 45514, महिला – 26820 – 15448 तृतीयपंथी – 0 – 0,एकूण – 89529 – 60962 (68.09 टक्के) अशी पुणे विभागातील प्राप्त आकडेवारी आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.१) मतदान घेण्यात आले. यासाठी गोंदिया जिल्ह्यात एकूण २५ मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. जिल्ह्यातील एकूण १६९३४ मतदारांपैकी १०७८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला असून त्याची टक्केवारी ६३.६८ आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा सुरुवातीपासूनच चूरस दिसून आली. या पदवीधर मतदारसंघासाठी एकूण १९ उमेदवार रिंगणात होते. जवळपास सर्वच उमेदवारांनी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला होता. मतदारांमध्ये सुध्दा या निवडणुकीबद्दल उत्साह दिसून आला. जिल्ह्यातील २५ ही मतदान केंद्रावर मंगळवारी सकाळी ८ वाजतापासूनच मतदान करण्यासाठी गर्दी दिसून आली. तर गोंदिया येथील मतदान केंद्रावर सायंकाळी ६.३० वाजतापर्यंत मतदारांची गर्दी होती. त्यामुळे या केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरुच होती.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील एकूण १६९३४ मतदार होते. यात ११३३० पुरुष तर ५६०४ महिला मतदारांचा समावेश होता. यापैकी मंगळवारी एकूण ६३.६८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला. जिल्ह्यातील सर्वच मतदार केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. विशेष म्हणजे नक्षलग्रस्त भागासाठी मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत होती. देवरी तालुक्यात ७३.३१ टक्के तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात ७१.४ टक्के मतदान झाले. पदवीधर मतदारसंघासाठी जिल्ह्यात एकूण २५ मतदान केंद्र ठेवण्यात आले होते. त्यात गोंदिया तालुक्यात ९, तिरोडा ४, आमगाव २, गोरेगाव २, सालेकसा १, सडक अर्जुनी २, देवरी २ आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात २ मतदान केंद्र होते. एकंदरीत जिल्ह्यात मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली.

मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जाणाऱ्या मतदारांना मतदान केंद्राच्या आत मोबाईल घेवून जाण्यास मनाई करण्यात आली होती. यासाठी मतदान केंद्राच्या प्रवेशव्दारावर मोबाईल जमा करण्यासाठी एक कांऊटर उघडण्यात आले होते. तिथे सर्वांचे मोबाईल जमा करुन ठेवले जात होते. मतदान करुन परत आल्यानंतर मोबाईल परत दिले जात होते.
चोख पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्हीची नजर
मतदान केंद्राच्या परिसरात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच मतदान केंद्राच्या आत आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. तर मतदान केंद्राच्या परिसरात बूथ लावण्यास किवा होर्डिंग, बॅनर लावण्यास मनाई करण्यात आली होती.

पदवीधर मतदारसंघाची निवडणूक यंदा प्रथमच हॉयटेक दिसून आली. मतदारांना त्यांच्या माेबाईलवर मतदार स्लीप, मतदान केंद्राचा पत्ता, मतदार यादीतील क्रमांक आदी पाठविण्यात आले होती. सर्वच प्रमुख पक्षाच्या उमेदवारांनी ही व्यवस्था केली होती. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुध्दा या निवडणुकीचा प्रचार केला जात होता. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रथमच हॉयकेट दिसून आली.
नक्षलग्रस्त भागात मतदानाची टक्केवारी वाढली
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा प्रथमच चांगली चूरस दिसून आली. यापूर्वी झालेल्या या निवडणुकीसाठी ऐवढा उत्साह मतदारांमध्ये दिसत नव्हता. मात्र कोरोनाच्या सावटाखाली निवडणूक होवून सुध्दा मतदान करण्यासाठी पदवीधर बाहेर पडले. विशेष म्हणजे नक्षलग्रस्त देवरी तालुक्यात ७१ टक्के तर अर्जुनी मोरगाव तालुक्यात ७५ टक्के मतदान झाले. कोरोनाच्या सावटाखाली पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडल्याने मतदान केंद्रावर संसर्ग टाळण्यासाठी पूरेपूर काळजी घेण्यात आली. मतदान केंद्राच्या प्रवेशव्दारावरच मतदारांची थर्मल स्क्रीनिंग, ऑक्सीजन लेव्हल तपासले जात होते. शिवाय मतदारांचे सॅनिटायझेशन करण्यात येत होते. तर प्रत्येक मतदाराला मतदान केंद्रावर हॅन्डग्लोज देण्यात येत होते. एकंदरीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी काळजी घेतली जात होती.

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भंडारा जिल्ह्यातील १८ हजार ४३४ मतदारांपैकी १३ हजार ३७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ७२.५६ आहे. जिल्ह्यातील २७ मतदान केंद्रावर शांततेत मतदान पार पडले. सायंकाळी ५ नंतरही काही मतदान केंद्रावर रांगा लागल्याचे दिसत होते. जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजता मतदानाला प्रारंभ झाला. सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत ३५३४ मतदारांनी म्हणजे १९.१७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर दुपारी २ वाजेपर्यंत ६९.२८ मतदारांनी म्हणजेच ३७.६९ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ४ वाजेपर्यंत १० हजार ६४९ मतदारांनी म्हणजे ५७.७७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी संथगतीने सुरु झालेले मतदान दुपारनंतर वेगाने सुरु झाले. काही मतदान केंद्रावर तर सायंकाळी ५ वाजेनंतरही मतदारांच्या रांगा दिसत होत्या. जिल्ह्यात १२ हजार ४४० पुरुष आणि ५ हजार ९९४ महिला असे १८ हजार ४४३ मतदार आहेत. त्यापैकी ९ हजार ४६२ पुुरुष आणि ३९१३ महिला मतदारांनी अशा एकुण १३ हजार ३७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरुषांच्या मतदानाची टक्केवारी ७६.०६ तर महिलांची ६५.२८ टक्के आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान साकोली तालुक्यात झाले असून तेथे ७८.०६ टक्के मतदानाची नोंद घेण्यात आली. मोहाडी तालुक्यात ६९.४७ टक्के, तुमसर ६६.१७ टक्के, भंडारा ७१.९९ टक्के, पवनी ७६.४३टक्के, लाखनी ७५.७९ टक्के आणि लाखांदूर तालुक्यात ७३.३० टक्के मतदान झाले. साकोली येथील मतदान केंद्र क्रमांक १५२ क्रमांकावर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान ८५.६९ टक्के झाल्याची नोंद घेण्यात आली.

जिल्ह्यात सर्वच मतदान केंद्रावर कोवीड-१९ च्या नियमांचे पालन करुन मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर प्रत्येक मतदाराची थर्मल स्कॅनिंग तपासणी केली जात होती. प्रत्येकाला सॅनिटाईज करुन आणि हँडग्लोज व मास्क देऊनच आतमध्ये सोडल्या जात होते. कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली. मात्र जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रापुढे मतदारांच्या लांब रांगा लागल्याचे दिसत होते. त्यामुळे फिजीकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसत होते.
दरम्यान जिल्हाधिकारी संदीप कदम आणि जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी भंडारा, लाखनी, जवाहरनगर येथील मतदान केंद्राला भेटी देऊन पाहणी केली. जिल्ह्यात अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
प्रमुख राजकीय पक्षांसह १९ उमेदवारांचे भाग्य मंगळवारी मतपेटीत बंद झाले आहेत. आता ३ डिसेंबर रोजी नागपूर येथे होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून कोण विजयी होणार यावर गावागावांत चर्चा सुरु झाल्या आहेत.

नागपुर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत येथील लाल बहादुर शास्त्री विद्यालयाच्या मतदान केंद्रावर जय ओबीसी लिहिलेली टोपी आणि गळ्यात दुपट्टा घालुन आलेल्या एका मतदाराला पोलिसांनी स्थानबद्ध केले. हा मतदार मतदान केंद्रावर पोहचताच भाजप कार्यकर्त्यांनी त्याला अडविले. आचार संहितेचा भंग होत असल्याचे सांगुन टोपी घालुन आत जाऊ नये अशी मागणी माजी सीनेट सदस्य महेंद्र निंबार्ते यांनी केली. यावेळी मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर चांगलाच वाद झाला होता. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्या मतदाराला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला स्थानबद्ध करुन भंडारा पोलीस ठाण्यात नेले. यासंदर्भात ठाणेदार सुधाकर चव्हाण यांना विचारले असता त्यांनी या प्रकाराला दुजोरा देत त्या मतदाराला ठाण्यात स्थानबद्ध केल्याचे सांगितले. तर महेंद्र निंबार्ते यांना विचारणा केली असता हा प्रकार म्हणजे सरळ सरळ आचार संहिता भंगाचा होय. त्यामुळे त्यांना रोखण्यात आले. पोलीस व मतदान केंद्राधिकाऱ्यांपुढे हा प्रकार घडल्याने आपण लेखी तक्रार दिली नसल्याचे सांगितले. मात्र यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती झाली होती.

नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गडचिरोलीत मंगळवारी ९००८ पदवीधरांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केलेल्यांमध्ये ६७५१ पुरूष व २२५७ महिला मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील २१ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रीया पार पडली. मतमाेजणी ३ डिसेंबर राेजी हाेणार आहे. विशेष म्हणजे, २०१४ च्या निवडणुकीत केवळ ३५.८६ टक्के मतदान झाले हाेते. त्या तुलनेत यावर्षी दुप्पट, म्हणजे ७२.३७ टक्के मतदान झाले. गडचिराेली तालुक्यात सर्वाधिक ३ हजार ३२५ मतदार हाेते. त्यामुळे तहसील कार्यालयात चार मतदान केंद्र ठेवण्यात आले हाेते. सकाळी ८ वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली. तहसील कार्यालयाच्या परिसरात मंडप टाकून मतदारांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली हाेती. मात्र बहुतांश मतदार दरवाजाच्या अगदी समाेर रांग लावून उभे असल्याने खुर्चीवर बसलेल्यांना तहसील कार्यालयाच्या मुख्य इमारतीत प्रवेश मिळत नव्हता. मतदान केंद्रासमाेरील रांग नियंत्रीत करण्यासाठी पाेलीस बंदाेबस्त लावला हाेता. दुपारी ३ पर्यंत मतदानाची वेळ असल्यामुळे १ वाजतानंतर माेठ्या प्रमाणात गर्दी झाली. त्यामुळे काही मतदारांना दाेन ते तीन तास प्रतीक्षा केल्यानंतर हक्क बजावता आला. ३ वाजता तहसील कार्यालयाचा मुख्य दरवाजा बंद करून आतमध्ये असलेल्या मतदारांना ३ वाजतानंतरही मतदानाची संधी देण्यात आली. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान चालले.

भाजप, काॅंग्रेस व इतर पक्षांनी तहसील कार्यालयापासून काही अंतरावर बुथ उभारले हाेते. या ठिकाणी मतदाराचा अनुक्रमांक, मतदान केंद्र क्रमांक शाेधून दिला जात हाेता. त्याचबराेबर आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याची विनंतीसुद्धा केली जात हाेती. मतदान केंद्र परिसरात काेणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी या परिसरातील सर्व पानठेले, चहा टपऱ्या बंद ठेवण्यात आल्या हाेत्या. ग्रामीण भागातूनही शेकडाे मतदार गडचिराेली येथे मतदानासाठी दाखल झाले. मतदान केंद्र परिसरात माेठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहने हाेती.
गडचिराेली : तालुक्यात सर्वाधिक ३३३५ मतदार हाेते. त्यामुळे येथील तहसील कार्यालयात पाच मतदान केंद्र ठेवण्यात आले हाेते. २३०३ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ६९.०५ टक्के एवढी आहे.
एटापल्ली : येथील तहसील कार्यालयात मतदान केंद्र हाेते. तालुक्यात एकूण ३९२ मतदार आहेत. त्यापैकी २५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १९८ पुरूष व ५२ महिला मतदारांचा समावेश आहे. एकूण ६३.७७ टक्के मतदान झाले. निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार अजयकुमार नष्ट हाेते.
अहेरी : तालुक्यात एकूण ८४० मतदार हाेते. त्यापैकी ६४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अहेरी व आलापल्ली या दाेन ठिकाणी मतदान केंद्र हाेती. अहेरी मतदान केंद्रावर ४३६ मतदारांपैकी ३३८ मतदारांनी मतदान केले. याची टक्केवारी ७७.५२ टक्के आहे. आलापल्ली येथील मतदान केंद्रावर ४०४ मतदारांपैकी ३११ मतदारांनी मतदान केले. याची टक्केवारी ७६.९८ टक्के एवढी आहे.
सिराेंचा : येथील मतदान केंद्रावर एकूण ३५० मतदार हाेते. त्यापैकी २८८ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ६७.६० टक्के एवढी आहे. २४९ पुरूष व ३९ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
धानाेरा : येथे एकूण ४२३ मतदार हाेते. त्यापैकी २२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ७६.३५ टक्के एवढी आहे. मतदान करणाऱ्यांमध्ये २४५ पुरूष व ७८ महिला मतदारांचा समावेश आहे.
चामाेर्शी : येथे एकूण १७१८ मतदार हाेते. तहसील कार्यालयात दाेन मतदान केंद्र ठेवण्यात आली हाेती. ११६८ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ६७.९९ टक्के एवढी आहे. २४९ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष म्हणून तहसीलदार आकाश अवथरे व २५० क्रमांकाच्या मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष म्हणून दिलीप दुधबळे यांनी काम पाहिले.
देसाईगंज : तालुक्यातील एकूण १४०९ मतदारांपैकी ११०० मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ७८.०६ टक्के एवढी आहे. देसाईगंजात दाेन मतदान केंद्रावर मतदान पार पडले.
आरमाेरी : तालुक्यात एकूण १६८१ मतदारांपैकी १२४६ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ७४.१२ टक्के एवढी आहे. मतदान केंद्र परिसरात चाेख पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता.
कुरखेडा : येथे एकूण ११९५ मतदार हाेते. त्यापैकी ८७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ७३.५५ टक्के मतदान झाले.
काेरची : तालुक्यात एकूण ४८३ मतदार हाेते. तहसील कार्यालयात एकच मतदान केंद्र हाेता. ३३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये २५५ पुरूष मतदार व ८० महिला मतदारांचा समावेश आहे. मतदानाची टक्केवारी ७३.९५ टक्के एवढी आहे.
भामरागड : तालुक्यात एकूण १३५ मतदार आहेत. त्यापैकी १८ महिला मतदार व ९० पुरूष मतदार अशा एकूण १०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बाहेरून येणाऱ्या वाहनांची तपासणी केल्यानंतरच प्रवेश दिला जात हाेता.
मुलचेरा : तालुक्यात एकूण ४४१ मतदार हाेते. त्यापैकी ३५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. काेराेनाच्या सावटातही मतदार मतदानासाठी बाहेर निघले.

दुपारी १ वाजतानंतर मतदारांची माेठ्या प्रमाणात गर्दी उसळली हाेती. तहसील कार्यालयाच्या अगदी समाेरच्या दरवाजावर मतदारांच्या रांगा हाेत्या. पाेलिसांच्या आदेशाने मतदार केंद्र परिसरात जात हाेते. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास गडचिराेलीचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर मतदान केंद्रावर दाखल झाले. त्यांनी दरवाजासमाेरील गर्दी हटवून सर्व मतदारांना खुर्च्यांवर बसण्यास सांगितले. यावरून मतदार व एसडीओ यांच्यामध्ये शाब्दीक चकमक उडाली. पण परिस्थिती हाताबाहेर गेली नाही.

एटापल्ली व भामरागडच्या मतपेट्या हेलिकाॅप्टरने रवाना
एटापल्ली व भामरागड हे नक्षलदृष्ट्या अतिशय संवेदनशील तालुके आहेत. मतदानादरम्यान काेणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी दाेन्ही ठिकाणी माेठ्या प्रमाणात पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. साेमवारी दाेन्ही ठिकाणी मतपेट्या हेलिकाॅप्टरने पाेहाेचवून दिल्या. मंगळवारी मतदान पार पडल्यानंतर मतपेट्या हेलिकाॅप्टरनेच रवाना करण्यात आल्या.

जिल्ह्यातील पदवीधर मतदारांची नाेंदणी २०१४ च्या संख्येएवढीच नाेंदविली गेली. मात्र मतदानाची टक्केवारी वाढली आहे. जिल्ह्यातील प्रशासनाने उत्तमप्रकारे मतदानाची प्रक्रीया पार पडली. काेराेनाचा संसर्ग असतानाही मतदार मतदानासाठी बाहेर पडले. तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालनसुद्धा केले. ही समाधानाची बाब आहे.

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातून सुमारे ६७.४७ टक्के मतदान करण्यात आले. २२ हजार १०३ मतदारांनी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. निवडणुकीसाठी उभे असलेल्या १९ उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले आहे. मतदानादरम्यान कुठेही अनुचित घटना घडली नाही.
जिल्ह्यात २२ हजार ३३ पुरूष, १० हजार ७२३ स्त्री व इतर ५ असे ३२ हजार ७६१ पदवीधर मतदार होते. त्यापैकी सुमारे १५ हजार ६५८ पुरूष, ६ हजार ४४४ स्त्री व इतर १ अशा एकूण २२ हजार १०३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने मतदान प्रक्रीयेवर लक्ष ठेवून होते. त्यांनी चंद्रपूर शहरातील आयटीआय, मातोश्री विद्यालय, खत्री महाविद्यालय, भवानजीबाई चव्हाण हायस्कूल, ज्युबली हायस्कुल इ. मतदान केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी भद्रावती, राजुरा, गडचांदूर व तालुक्याती इतर मतदान केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) संपत खलाटे यांनी जिल्ह्यात विविध मतदान केंद्रावर भेटी देऊन पाहणी केली. हॅन्ड सॅनिटराईज केल्याशिवाय मतदान कक्षामध्ये मतदारांना प्रवेश नव्हता. जिल्ह्यात सकाळी १० वाजतापर्यंत ७. ७७ टक्के, दुपारी १२ वाजेपर्यंत १८.९४ टक्के, दुपारी २ वाजेपर्यंत ३६.८९ टक्के, ४ वाजेपर्यंत ५४.१६ टक्के तर ५ वाजेपर्यंत सुमारे ६७.४७ टक्के मतदान झाले.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडनणुकीत मंगळवारी भरभरुन मतदान झाले. मतदानासाठी मोठ्या रांगा लागल्याचे चित्र जवळपास सर्वच मतदान केंद्रावर दिसले. सर्वाधिक मतदान औरंगाबाद जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यात १ लाख ६ हजार ३७९ मतदारांपैकी ६७ हजार ७४ पदवीधरांनी म्हणजे ६३.०५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ५ पैकी २ तृतीयपंथीय मतदारांनी मतदान केले. ग्रामीण भागातील ७० टक्के मतदानाचा अंदाज आहे.

सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान झाले. शेवटच्या तासात मतदानाचा जोर वाढला. सकाळच्या सत्रात ९.२७ टक्केच मतदान झाले. दुपारच्या सत्रात २०.४८ टक्के मतदान झाले. दुपारी १२ ते २ यावेळेत ३६.९१ टक्के मतदान झाले. २ ते ४ वाजेपर्यंंत ५१.९८ टक्के मतदानाची नोंद झाली. ४ ते ५ या तासात ६३ टक्क्यांपर्यंत मतदान पोहोचले. या ३१ हजार ४१५ महिला मतदारांपैकी १६ हजार ९०७ महिला पदवीधरांनी मतदान केले. अंतीम तासात १२ टक्के मतदान झाले.

पुणे विभागात पदवीधर व शिक्षक विधान परिषद मतदार संघात प्रथमच सर्वाधिक मतदान झाले आहे. या मतदार संघातील सर्व जिल्ह्यातील मतदान पेट्या पुण्यातील बालेवाडी गुरूवारी पहाटेपर्यंत पोहचतील. त्यानंतर बुधवार (दि.३) रोजी बालेवाडी येथे मतमोजणीला सुरुवात होईल. परंतु यावेळी उमेदवारांची प्रचंड संख्या,त्यात झालेले भरघोस मतदान आणि मतमोजणीची किचकट प्रक्रिया यामुळे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचा अंतिम निकाल जाहीर होण्यासाठी शुक्रवारची दुपार अथवा सायंकाळपर्यंत जाहीर होईल असे अधिकृत सूत्रांनी सांगितले. पुणे विभागात पदवीधरसाठी ५७. ९६ तर शिक्षकसाठी ७३.०४ टक्के मतदान झाले आहे.

कोविड- 19 च्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने स्वतंत्र मार्गदर्शक सुचना केल्या होत्या. यामध्ये कोविड संशयित, होम क्वारंटाईन, हाॅस्पिटलमध्ये अँडमिट असलेल्या व ६५ वर्षांवरील सर्व मतदारांसाठी पोस्टल मतदान करण्याची सुविधा देण्यात आली होती. ऐवढेच नाही तर मतदानच्या एक-दोन दिवस आगोदर पाॅझिटिव्ह आलेल्या मतदारांचा मतदानाचा हक्क अबाधित राखण्यासाठी मतदानाच्या दिवशी शेवटचा एक तास खास कोविड पाॅझिटिव्ह रुग्णांसाठी देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या.

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या तीन मतदारसंघासह पुणे आणि अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी १ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. कोरोनानंतर राज्यात प्रथमच ही जाहिर निवडणूक झाली असल्याने निवडणूक आयोगाकडून विविध मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. यात मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांना पीपीए किट पासून, सॅनिटायजर, हॅन्ड ग्लोज सर्व साहित्य व सुविधा देण्यात येणार आहे. याशिवाय मतदान केंद्रांची संख्या १२०० वरून ५०० ते ७०० करणे, मतदान केंद्राच्या बाहेर थर्मल गन द्वारे तपासणी करणे, सॅनिटायजर करणे आदी विविध प्रकारची खबरदार घेण्यात आली होती.

मतदान केंद्रांवर जाणाऱ्या मतदारांना यापूर्वी मतदान करण्याआधी ओळखपत्र दाखवावे लागत होते. परंतु, कोरोना काळात पार पडलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगळवारी थर्मल गनने शरीराच्या तापमानाची तपासणी केल्यानंतरच मतदान केंद्रांवर मतदारांना प्रवेश देण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आरोग्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पहिल्यांदाच मतदान केंद्रांवर जबाबदारी पार पाडली.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रत्येक मतदाराच्या सुरक्षेला प्राधान्यक्रम देण्यात आला. निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला मास्कचा वापर बंधनकारक केला होता. मतदान केंद्रांवर आरोग्य अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले होते. सकाळपासूनच मतदार मतदान केंद्रावर येत होते. कोरोनाच्या लक्षणात ताप हे एक प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावरच मतदारांना थांबवून त्यांची थर्मल गनने तपासणी करण्यात येत होती. शरीराचे तापमान योग्य असेल तरच मतदारांना आत प्रवेश दिला जात होता. शिवाय, मास्कही बंधनकारक होता. अनेक जण विनामास्क येत होते. त्यांना मास्क लावण्याची सूचना कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती. मास्कचे वाटपही करण्यात आले. मतदानासाठी उभे राहिल्यानंतर सुरक्षीत अंतर राखण्यासाठी चौकोन आखले होते. त्या चौकोनमध्येच उभे रहा, अशी सूचना मतदारांना केली जात होती. मतदानासाठी आतमध्ये जाणाऱ्या मतदाराच्या हातावर सॅनिटायझर टाकले जात होते. आरोग्य उपसंचालक डाॅ. स्वप्निल लाळे म्हणाले, यापूर्वी घेण्यात आलेल्या परीक्षांत जी काळजी घेतली, त्याचप्रमाणे मतदानप्रक्रियेत आरोग्य विभागाने जबाबदारी पार पाडली.

मतदान कक्षात लहान मुलांना नेण्यास मज्जाव होता. अनेक महिलांनी मतदानावेळी सोबत लहान मुलांना आणले होते. अशा लहान मुलांचा सांभाळ करण्यासाठी महिला कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. एरव्ही २० ते २५ टक्के मतदान होत होते. परंतु कोरोनाकाळाची बंधनं असतांनाही सगळीकडे विक्रमी मतदान झाले आहे. त्याबद्दल सर्व मतदारांचे अभिनंदन ! लोकशाहीप्रती अशीच सजगता कायम राहो!!!

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
०३.१२.२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *