आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी कापसी ग्रामस्थांची घेतली भेट

लोहा; प्रतिनिधी

कापसी(बु) ता. लोहा येथे संतोष पा.वडवळे यांच्या आईच्या प्रथम पुण्यस्मरनानिमित्त दि.४ डिसेंबर रोजी कापसी येथे लोहा कंधार लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब व सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे व जिल्हा नियोजन समिती सदस्य रावसाहेब पा. शिंदे उपस्थित होते.

प्रथमतः कै. सुंदरबाई माधवराव पा.वडवळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले त्यानंतर आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब व आशाताईंचा व रावसाहेब पा. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी माजी जि.प.सदस्या शकुंतलाबाई रावसाहेब शिंदे , भास्करराव पा. जोमेगावकर, जिल्हा नियोजन समिती सदस्य बालाजीराव वैजाळे,राजू पा. कापसीकर,कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती अरुण पा. कदम,पंडित पा. वडवळे, कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार संचालक संभाजी पा. पानपट्टे,शिवराज पा. शिंदे,संजय पा. वडवळे,गोविंदराव जहागिरदार,बालाजी पा. करमाळेकर,सरपंच हिंदोळा आनंद पा. जाधव,गोळेगाव सरपंच प्रभाकर पा. ढाले,अनिकेत पा. जोमेगावकर,सचिन जाधव कार्यक्रमाचे आयोजक संतोष पा. वडवळे सह संपूर्ण वडवळे परिवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *