पानभोसी येथील सैनिक शिवानंद नाईकवाडे यांचा गावकऱ्यांनी केला सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

पानभोसी येथील सैनिक शिवानंद नाईकवाडे यांनी भारतीय सैन्यामध्ये आपले 16 वर्षे सेवा पुर्ण करून २/१२/२०२० ला सेवानिवृत्त झाले.


त्यांच्याच गावातील गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून सैनिका विषयी आदर दाखवून एक भव्य असा सत्कार सोहळा कार्यक्रम ठेवन्यात आला होता.

त्या कार्यक्रमाला सामाजिक कार्यक्रत्या सौ. आशाताई शिंदे,माजी जि.प.सदस्य संजय भोसीकर,वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले, माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड ,माजी सैनिक अर्जुन कांबळे,माजी सैनिक पोचीराम वाघमारे,माजी सैनिक गोविंद सुर्यवंशी, माणिकराव देवकाते,पेठकर आणि परिसरातील सर्व आजी सैनिक व नातेवाईक ,मित्रमंडळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *