माजी खासदार ,आमदार डॉ.भाई केशवराव धोंडगे यांनी केले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

शंभराव्या वर्षी भाई झाले विश्वरत्ना समोर नतमस्तक

कंधार ; प्रतिनिधी


महामानव बोधीसत्व भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महानिर्वाण दिनी नगर परिषद कंधारच्या प्रांगणातील दिमाखादार विद्रोही विचारवंत,अर्थतज्ज्ञ, समाजरत्न,सामाजिक क्रांतिवीर,कायदे पंडित, संविधानकार, प्रख्यात साहित्यिक,लेखनी बहाद्दर मुकनायकचे संपादक, चवदार तळ्याचे सत्याग्रही वीर अशा नानाविध बिरुदावली लिहिल्या तरी आणखी कितीतरी बिरुदावल्या लावता येणारे व्यक्तीमत्व विश्वरत्न, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दि.६डिसेंबर रोजी महापरीनिर्वाण दिनी मन्याड खोर्‍यातील चीर तरुण लढवय्य व्यक्तीमत्व माजी खासदार व आमदार डाॅ.भाई केशवराव धोंडगे आणि माजी जि.प.सदस्य डाॅ.प्रा.पुरुषोत्तम धोंडगे या पिता-पुत्रांनी अभिवादन करुन मानाची कोटि-कोटि जयक्रांति अर्पण केली.

विश्वरत्नाला अभिवादन करण्यासाठी वयाच्या शंभरव्या वर्षीही धडपड यावेळी दिसून आली.

सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *