महापरिनिर्वाण दिनानिमित्त घटनाकारांना फुलवळ येथे अभिवादन.

फुलवळ ; धोंडीबा बोरगावे

६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त कंधार तालुक्यातील फुलवळ येथे ठिकठिकाणी घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

फुलवळ येथील ग्राम पंचायत कार्यालय , जि.प.कें.प्रा. शाळा , श्री बसवेश्वर विद्यालय , बौद्ध विहार आदी ठिकाणी महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक बालाजी केंद्रे , मुख्याध्यापक बी एन मंगनाळे , गोविंदराव मंगनाळे , नागनाथ गोधणे , नवनाथ बनसोडे , प्रवीण मंगनाळे , सागर मंगनाळे , केदार देवकांबळे , मंगेश पांचाळ , पत्रकार मधुकर डांगे , हिरकांत मंगनाळे , उमर शेख आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *