चाळ म्हणतेय ढोलकीला,….
तुझ्या तालावर मी नाचते!….
मध्येच तुणतुणं वाजल्याने,….
लावणी नृत्य साकार होते!….
साम्राज्ञी चव्हाण सुलोचना,…
सुमधूर लावणी गळी गाते!…
तमाशाच्या फडात नाचतांना,…..
लावणी नृत्य ठेका धरते!…
पुणेकरांच्या सुरेख आदाने,…
मात्र सातासमुद्रापार गाजते!…
राज्याची आन-बान-शान,…
नखशिखांत झाकलेलीच,….
लावणी श्रृंगारीक वाटते!….
पुराण्या मराठी चित्रपटात,…..
तिच्या शिवाय ना पान हालते!…
गण-गवळण झाल्या नंतर,….
लावणी नृत्य सादर होते!…
गोपाळसुत
दत्तात्रय एमेकर गुरुजी
क्रांतिभुवन बहाद्दरपुरा