भारत बंद ला फुलवळ येथे उत्स्फूर्त प्रतिसाद.

फुलवळ (धोंडीबा बोरगावे )

केंद्र सरकारने केलेल्या शेतकरी कायद्याच्या विरोधात ता. ८ डिसेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंद च्या समर्थनार्थ कंधार तालुक्यातील फुलवळ येथे स्वयंस्फूर्तीने उत्स्फूर्त प्रतिसाद देत कांहीं काळ मार्केट व रस्ता बंद करून करून घोषणाबाजी करत सौम्य आंदोलन करण्यात आले.

सकाळी ठीक १० वाजता येथील ग्रामस्थ व शेतकरी पुत्र एकत्रित येऊन मार्केट मधील सर्व दुकानदारांना भेटून विनंतीपूर्वक साथ मागत जगाच्या पोशिंद्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंद ला समर्थन देण्यासाठी आपण आपापली दुकाने , प्रतिष्ठाने काही वेळा करिता बंद ठेवून या आंदोलनात सहभागी व्हावे अशी विनंती केली असता येथील सर्व दुकानदारांनी प्रतिसाद देत आपापली दुकाने बंद केली आणि बंद मध्ये सामील झाले.

मार्केट तर बंद झाले पण वाहन चालूच होती त्यामुळे रस्त्यावरील वाहनेही बंद झाले पाहिजेत यासाठी मुख्य रस्त्यावर टायर जाळून काही काळ वाहनेही बंद ठेवण्यात आले होती.

येथील बंद ला कुठलेही हिंसक वळण लागूनये याची खबरदारी घेण्यासाठी कंधार पोलीस ठाण्याचे API एस यु जाधव , PSI राजलींग सातानुरे , बिट जमादार गोंटे यांच्या अन्य कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तात्काळ फुलवळ येथे दाखल झाला होता परंतु ते येथे पोहचण्यापूर्वीच येथील आंदोलनकर्त्यांनी शांततेत घोषणाबाजी करून बंद संपुष्टात आणला व वाहने सुरळीत चालू करून दिली , तसेच मार्केट मधील दुकानेही उघडण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *