यांची देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडे मागणी
नांदेड प्रतिनिधी : नवीन कृषी कायद्याच्या विरोधात देशातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन शेतकऱ्याच्या सर्वसमावेशक हिताचा कायदा तयार करावा व शेतकऱ्यांच्या विरोधी बहुमताच्या जोरावर संसदेत मंजूर केलेला काळा कायदा रद्द करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन नांदेड जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देशाचे पंतप्रधान श्री मा नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याकडे शिवराज्य युवा संघटनेच्या नांदेड जिल्ह्याच्या वतीने एका लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात नवी दिल्ली मध्ये हजारो शेतकरी गेल्या दहा दिवसापासून कडाक्याच्या थंडिमध्ये आंदोलन करीत आहेत या आंदोलनाला शिवराज्य युवा संघटना नांदेड जिल्ह्याच्या वतीने पाठिंबा देऊन शेतकऱ्यासाठी शिवराज्य युवा संघटना नेहमीच नांदेड जिल्ह्यात काम करत आहे त्यासाठी शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघटनेच्या वतीने वेळोवेळी आंदोलनही करणार आहोत असेही शिवराज्य युवा संघटनेचे नांदेड जिल्हा प्रमुख विक्रम पाटील बामणीकर यांनी म्हटले आहे.
व.जय जवान जय किसान हा नारा ज्या महान नेत्यांनी भारताला दिला त्या माजी पंतप्रधान कै.श्री.लाल बहादुर शास्त्री यांचे परत एकदा स्मरण करण्याची वेळ आली आहे कारण ज्या भारतीय शेतकऱ्यास भारतीय जवानाचा दर्जा कै.श्री.लाल बहादुर शास्त्री यांनी दिला होता. सीमेवर जवान आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या देशाची आपल्या देशवासीयांचे रक्षण करतो व शेतकरी राजा ऊन पाऊस थंडी याची पर्वा न करता रात्रंदिवस शेतात राबतो व सर्व देशवासियांना अन्नधान्याची सर्वांना पुरवठा करतो आहे पण या देशाचे पंतप्रधान मात्र देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे तयार करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम करत आहेत त्यामुळे संसदेतील केलेला शेतकरी विरोधी कायदा तात्काळ रद्द करून जगातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्का प्रमाणे जगता यावे असा कायदा तात्काळ मंजूर करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन शिवराज्य युवा संघटना नांदेड जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत देशाचे पंतप्रधान श्री मा नरेंद्रजी मोदी साहेब यांना पाठविण्यात आले आहे दिलेल्या निवेदनावर विक्रम पाटील बामणीकर जिल्हाप्रमुख नांदेड प्रदीप पाटील जिल्हाप्रमुख नांदेड भाऊसाहेब पाटील चव्हाण तालुकाप्रमुख तुकाराम पाटील जोगदंड युवा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी पाटील शिंदे तालुका उपाध्यक्ष परमेश्वर पाटील भागानगरे तालुका कार्याध्यक्ष यांच्यासह अनेक शिवराज्य युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.