मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या अध्यक्षपदी अँड शिवसांब अप्पा चवंडा यांची निवड.


अहमदपूर ; प्रा.भगवान आमलापुरे

मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या अध्यक्षपदी येथील प्रतिष्ठित उद्योजक अँड शिवसांब अप्पा शिवराज अप्पा चवंडा अहमदपूरकर यांची एकमताने म्हणजे बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व स्थरातून अभिनंदन होत आहेत.


थोर स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तिर्थ यांनी मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीची स्थापना केली होती. ही एक सामाजिक संस्था आहे.अँड शिवसांब अप्पा शिवराज अप्पा चवंडा, हे खादी ग्रामोद्योग समिती, लातूर जिल्ह्याचे गत १२ वर्षांपासून सक्रीय सदस्य आहेत. त्यांच्या रुपाने मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या अध्यक्षपदाचा बहुमान प्रथमच लातूर जिल्ह्यास मिळाला आहे. प्रसिद्धी पराडमुख व्यक्तीमत्व असणारे अँड शिवसांब अप्पा चवंडा यांना खरे तर निवडणुकीला उभे राहण्याची इच्छा देखील नव्हती. पण इतर सदस्यांनी त्यांच्या कामाचा आवाका, काम करण्याची पद्धत आणि कामातील लगान पाहून त्यांचे नाव परस्पर सुचवले. दुसऱ्यानीच अनुमोदन दिले. हेच अँड शिवसांब अप्पा चवंडा यांचे मोठेपण होय. असी चर्चा जनमानसात होते आहे.


व्यवसायाने वकील असणारे अँड चवंडा शक्यतोवर व्यासपीठावर बसत नाहीत. पुर्वी ते वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या Board of studies वर ( अभ्यास मंडळावर ) सदस्य होते. अहमदपूर municipality ( नगरपालिकेचे ) १० वर्षे सदस्य होते तर market committee ( क्रषी उत्पन्न बाजार समितीचे ) १४ वर्षे संचालक होते.


मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या अध्यक्षपदी अँड चवंडा यांची बिनविरोध निवड झाल्याबदल प्रा भगवान आमलापूरे यांनी त्यांची सहकुटूंब भेट घेतली आणि शब्दसुमनाने अभिनंदन केले. त्यावेळी अँड चवंडा म्हणाले की खादी quality गुणवत्ता देते. पण ती स्वस्त नाही. उलट ती महाग आहे. कारण येथे सर्व उत्पादन कामगारांच्या जीवावर, हातावर अवलंबून आहे.मशीन, यंत्र जे कापड तासभरात १०- १२ मीटर तयार करु शकते, तेवढ्यात वेळात कामगार आपल्या हाताने, हातावर एक मीटर ( ०१ ) कापड तयार करु शकतो. असेच इतर वस्तूचेही आहे. म्हणून खादी कापड आणि वस्तू महाग आहेत. असेही ते प्रा भगवान आमलापूरे यांच्याशी बोलताना सांगितले.
शिवाय बाजारातील इतर products उत्पादने कोणत्या गुणवत्तेची आहेत. याचा परवा भांडाफोड झाला आहे.त्यामुळे भविष्यात खादी कपडे आणि इतर उत्पादनास मागणी वाढेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


दरम्यान अहमदपूरात खादी महोत्सव, खादी सेल लावला जातो. पण त्या खादी कापडाशी, महोत्सवासी आणि सेलसी आपला काही संबंध नाही.असे ते शेवटी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *