कंधार ; प्रतिनिधी
कंधार पोलीस स्टेशन हद्दीत कंधार लोहा रस्तावरील मराठा बार जवळील शेतात बोरीच्या झाडाला एका अनोळखी पुरुष जातीचे( वय अंदाजे 32/35 वर्ष)प्रेत दि.१० डिसेंबर रोजी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.शेत मालक रामसिंग गौर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कंधार पोलीसात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर असे की आज दि.१० डिसेंबर रोजी कंधार लोहा रस्तावरील मराठा बार जवळील लगतच्या रामसिंह गोपाळसिंह गौर (३२)राहणार कंधार यांच्या शेतातील बोरीच्या झाडाला एक पुरुष जातीचा अनोळखी इसम गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.याबाबत कंधार पोलीसात शेत मालक रामसिंह गोपाळसिंह गौर यांनी फिर्याद दिली.दिलेल्या फिर्यादीवरुन
तात्काळ पोलीस पथक रवाना झाले.सदरील इसमाचे शव कंधार येथिल ग्रामीण रुग्णालयात शव गृहात ठेवण्यात आले असून अनोळखी इसम असल्याने त्याचे शवविच्छेदन उद्या करण्यात येणार आहे.
सदरील गळफास घेतलेल्या इसमाचे डोक्याचे व दाढीचे केस वाढलेले असून अंगात गुलाबी रंगाचे शर्ट व निळा जिन्स असुन डोक्याला पांढरा रुमाल असल्याची माहीती पोलीस स्टेशन कंधार यांच्या कडून देण्यात आली आहे.
सदरील प्रकरणी खबर मिळताच कंधार पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यु.एम.कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ केंद्रे ,पो.हे.कॉ.आर.यु.गणाचार्य ,पि.व्ही.टाकरस,पो.हे.कॉ.व्यंकट पाटील,पो.हे.कॉ.एन.टी.वानरे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी केली.
कंधार पोलीसात 48/2020 कलम
174 अन्वये आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ केंद्रे करत आहेत.सदर वरील वर्णणाचा इसम साठी पोस्टे कंधार येथे संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले आहे.