लोहा ;प्रतिनिधी
दिनांक 10 डिसेंबर 2020 रोजी वार गुरुवार रोजी लोहा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित लोहा व दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन नांदेड अंतर्गत हमीभावाने धान्य उडीद,मूग,तूर,हरभरा,ज्वारी,सोयाबीन खरेदी केंद्राचा शुभारंभ
सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष लोहा कंधार लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब व कार्यक्रमाचे उदघाटक सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे प्रमुख पाहुणे नांदेड मनपा माजी उपमहापौर तथा आनंद चव्हाण,जिल्हा नियोजन समिती सदस्य रावसाहेब पा. शिंदे,जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील,जिल्हा नियोजन समिती सदस्य बालाजी वैजाळे,जिल्हा नियोजन समिती सदस्य अनिलजी मोरे,जिल्हा जि.प.माजी सभापती संजय पा. कराळे,नगरसेवक जीवन चव्हाण, नवनिर्वाचित सभापती स्वप्नील पा. उमरेकर,नवनिर्वाचित उपसभापती श्याम अण्णा पवार,संदीप पा. उमरेकर,लोहा शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष वसंत बापू पवार,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ज्ञानेश्वर चोंडे,बालाजी खिलारे, सह पोलीस निरीक्षक जायभाये,सहाय्यक निबंधक कोंडवार सर, बोदगिरेआदी उपस्थित होते.