नांदेड: 10,
बिलोली साठेनगर येथील मुकबधीर मुलीवर काही नराधमांनी 9 नोव्हेंबर रोजी अमानवीय अत्याचार करून पुरावे नष्ट करण्यासाठी दगडाने ठेचून हत्या केली आहे.या काळ्या घटनेच्या निषेधार्थ डाव्या ,आंबेडकरवादी,पुरोगामी पक्ष संघटनेच्या वतीने मा.जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे निषेध नोंदवून मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना मा.जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
आरोपींना तात्काळ अटक करावे व महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने पारित केलेल्या दिशा कायद्यनुसार 21 दिवसात फाशीची शिक्षा देण्यात यावी. सदरील खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा.सदरील खटल्यात राज्य सरकारच्या वतीने तज्ञ व नामांकित वकिलाची नेमणूक करावी अश्या मागण्या करण्यात आल्या. शिष्टमंडळाचे नेतृत्व भारतीय कम्युनिस्ट पार्टी,( युनायटेड )चे ,राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी कॉ. प्रा.सदाशिव भुयारे, राज्य उपाध्यक्ष कॉ.प्रा.इरवंत सुर्यकर,माकप चे नांदेड शहर सचिव कॉ.गंगाधर गायकवाड, अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष मा. सतीश कावडे, नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवाजी नुरूनदे, लहुजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रविकांत पवळे, आपला महाराष्ट्र ग्रुपचे अशोक वाघमारे, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (युनायटेड) चे नांदेड जिल्हाध्यक्ष कॉम्रेड अंबादास भंडारे, भारतीय स्टुडंट्स फेडरेशनचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष कॉम्रेड दिलीप कंधारे, नांदेड जिल्हाध्यक्ष,कॉम्रेड गोपाळ वाघमारे , नांदेड जिल्हामहाससिव कॉम्रेड माधव भुयारे, भारतीय ऑटो युनियन चे नांदेड शहर संघटक शांतवन दामोदर ,रंगनाथ गजले,दाऊ गाडनेवाड आदीने केले.