तिफण कविता महोत्सवात समग्र वाड्मयीन योगदानाबद्दल होणार सन्मान …..
कन्नड :
त्रैमासिक तिफण , भाषा , साहित्य , संस्कृती आणि संशोधन परिषद शाखा कन्नडच्या वतीने मागील वर्षापासून साहित्य ,क्षेत्रात महत्वपूर्ण व दखलपात्र योगदान देणाऱ्या साहित्यिंकांना साहित्य सन्मान पुरस्कार देण्यात येतो .कन्नड तालुक्यातील वाङ्मयीन चळवळ व साहित्याचा , समग्र योगदानाचा यथोचित सन्मान व्हावा या उद्देशाने हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे .
मागील वर्षी डॉ . रमेश सूर्यवंशी यांना हा पुरस्कार देण्यात आला . या वर्षीच्या पुरस्कार कन्नड येथील ज्येष्ठ साहित्यिक , अभ्यासक डॉ . अंबादास सगट यांना जाहिर करण्यात आला आहे .
ङॉं . सगट हे कन्नड येथील डॉ . भीमराव आंबेडकऱ कनिष्ठ महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक , कवी , लेखक आणि संशोधक तसेच सामाजिक कार्यकर्ते आहेत . डागणी , अण्णाभाऊ साठे , गौरवशाली शौर्य परंपरा आणि मातंग समाज , अण्णाभाऊ साठे व्यक्ति आणि वाड्मय, मराठी शाहिरी परंपरा आणि अण्णाभाऊ साठे , फुर्मान गडया रे , महात्मा फुले , व्यक्ति विचार आणि क्रांतिकार्य , दलित साहित्य आणि मुक्ता साळवेंचा निबंध , कैफियत , मातंग आणि सांस्कृतिक राष्ट्रसंघ भारत आदी पुस्तके त्यांची प्रकाशित आहेत .शेष ग्रामीण साहित्य संमेलन , अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान त्यांनी भूषविले आहे .
उत्तम वक्ते , व प्रगल्भ सामाजिकजाणिवेचे साहित्यिक व सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते आहेत. कन्नड नगर परिषदेचे उपाध्यक्ष , कन्नड तालुका औद्योगिक ग्रामीण बुउद्देशिय संस्थेचे उपाध्यक्ष तसेच भारतीय दलित संसदेचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत . कविता , कथा , चरित्र , संशोधन , समीक्षा , ललित , प्रासंगिक , वैचारिक लेखन विविध नियतकालिकात प्रसिद्ध आहे . सेवा निवृती नंतर लेखन व सामाजिक कार्य यास त्यांनी वाहून घेतले आहे . तिफण कविता महोत्सवात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती तिफणचे संपादक , डॉ . शिवाजी हुसे , पुरस्कार निवड समितीचे डॉ . प्रकाश खेत्री , डॉ . रामचंद्र झाडे ,संशोधन परिषदेचे कन्नड शाखेचे अध्यक्ष प्रविण दाभाडे , सचिव अरूण थोरात , कार्याध्यक्ष संदीप ढाकणे , प्रा .डाॅ . सूर्यकांत सांभाळकर , ज्ञानेश्वर गायके , प्रकाश शहरवाले , सुरेश आवटे ,प्रा . रमेश वाघचौरे , भीमराव सोनवणे, का, का .थोरात ,संदीप वाकडे , अजय दवंडे ,भरत सोनवणे यांनी दिली .