कंधार :- प्रतिनिधी
यश हाँस्पिटल आणि प्रसुतीगृह कंधार येथील डाँ. बालाजी कागणे व डाँ. सौ. संगीता बालाजी कागणे यांच्या वतीने भवानी नगर कंधार येथे आज दि. 10 डिसेंबर 2020 रोजी 10 ते 3 वाजेपर्यंत मुळव्याध, भंगदर, फिशर व गुदगत आजारावर मोफत तपासणी शिबीरा संपन्न झाले .तालुक्यातील जवळपास ३0 ते ३५ रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.
कंधार शहरात व ग्रामीण भागातील रुग्णांनी कोणतेही आजार लपवून न ठेवता वेळीच त्यावर उपचार घेणे गरजेचे असून त्यामुळे आजार वाढणे थांबते. आजच्या शिबीराला प्रतिसाद मिळाला असून पुढेही मोठ्या स्वरुपात यासह अन्य रोगावर तज्ञ डॉक्टर बोलावुन भविष्यात शिबीर आयोजित करणार असल्याची माहीती यावेळी डॉक्टर
बालाजी कागणे व डॉ. संगीता बालाजी कागणे यांनी दिली.
शहरातील विवीध मिडीयाच्या माध्यमातुन शहरातील पत्रकार बांधवानी या शिबीराची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देवून सहकार्य केल्याने हा उपक्रम सर्वा पर्यत पोहचला असल्याने सर्वा पत्रकार बांधवाचे आभार मानन्यात आले.
***** Video news ***