कंधार ; प्रतिनिधी
बिलोली साठेनगर येथील मुकबधीर मुलीवर काही नराधमांनी 9 डिसेंबर रोजी बलात्कार करून अमानवीय अत्याचार करून पुरावे नष्ट करण्यासाठी दगडाने ठेचून हत्या केली आहे. त्या आरोपींला दिशा कायद्याअंतर्गत फाशीची शिक्षा देवून न्याय द्यावा अशी मागणी दि.११ डिसेंबर रोजी संयुक्त ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने तहसिलदार व्यंकटराव मुंडे यांना निवेदना द्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले की बिलोली साठेनगर येथील मुकबधीर मुलीवर बलात्कार करून अमानवीय अत्याचार करून पुरावे नष्ट करण्यासाठी दगडाने ठेचून हत्या केली आहे.त्या आरोपीला महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने पारित केलेल्या दिशा कायद्यनुसार 21 दिवसात फाशीची शिक्षा देण्यात यावी. सदरील खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा.सदरील खटल्यात राज्य सरकारच्या वतीने तज्ञ व नामांकित वकिलाची नेमणूक करावी. अन्यथा संयुक्त ग्रुप महाराष्ट्र राज्याच्या वतीने महाराष्ट्र मध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल.
या निवेदनावर साईनाथ मुळगे, सरोज मोरे ,महेश मोरे ,मनोज कांबळे, राजू मळगे, विजय वाघमारे, दत्ता मोरे, देविदास बसवंते,नामदेव डुबुकवाड सह मातंग समाजातील कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
*** Video news**–