माळाकोळी ; एकनाथ तिडके
शेतातील आखाड्यास आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना हरणवाडी तालुका लोहा येथे घडली आहे, अल्पभूधारक शेतकरी असलेले नामदेव नकितवाड या शेतकऱ्यांचे आगीमुळे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.
हरणवाडी येथील नामदेव नारायण नकितवाड यांच्या शेतातील आखाड्यास दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता आग लागली या या आगीत सात शेळ्या मृत्युमुखी पडल्या तर दोन बैल भाजले आहेत शिवाय आखाड्यात असलेला पन्नास ते 60 क्विंटल कापूस 20 क्विंटल सोयाबीन दहा क्विंटल ज्वारी डाळ व इतर शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.
नामदेव नकिवड हे अल्पभूधारक शेतकरी असून ते इतर शेत मालकांची शेती वाहून कुटुंब चालवायचे अतिशय कष्टाळू असलेले नकितवाड हे कुटुंबातील जबाबदाऱ्यांमुळे कर्जबाजारी झाले होते , यावर्षीच्या सुगी तून बरेचसे कर्ज फिटणार होते मात्र शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले असून कर्जाचा डोंगर अजूनही वाढलाच आहे.
घटनास्थळावर प्रहार’चे तालुका अध्यक्ष माऊली गीते व इतर पदाधिकार्यांनी भेट देऊन.. संबंधित शासकीय यंत्रणेला पंचनामा करण्यास सांगितले व पुढील शासकीय मदत मिळवून देण्याकरिता ना. बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून या शेतकऱ्यास मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले .