कोरोना काळात स्वच्छता कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर वाटप हा लॉयन्स परीवाराचा स्तुत्य उपक्रम — खा. प्रतापराव पाटील चिखलीकर

नांदेड

प्रभाव रोखण्यामध्ये अतिशय मछपरिवाराचा असल्याचे प्रतिपादन खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पाच हजार मास्क व सॅनिटायझर वितरण कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी केले.

लॉयन्स क्लब नांदेड मीडटाऊन व नांदेड सेंट्रल च्या वतीने मनपा क्षेत्रीय कार्यालय वर्कशॉप येथे घेण्यात आलेल्या कार्यक्रमा प्रसंगी बोलताना खा. चिखलीकर यांनी असे सांगितले की, ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नवीन नवीन संकल्पनेमुळे मायेची ऊब, लॉयन्सचा डबा यासारखे सेवा कार्याचे अनेक प्रकल्प यशस्वीरीत्या सुरू आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान नांदेड शहरात असल्यामुळे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी तत्पर आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले हे होते. प्रमुख अतिथी म्हणून संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी, दिव्यांग मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पळसकर, ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर नोमुलवार, क्षेत्रीय अधिकारी मिर्झा बेग, कार्यालय अधीक्षक राजेश जाधव पाटील हे उपस्थित होते. लॉयन्स सेंट्रलचे अध्यक्ष संजय अग्रवाल तसेच मिड टाऊनचे कोषाध्यक्ष शिरीष गिते यांनी सर्वांचा सत्कार केला. संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी आपल्या प्रास्ताविकातून पाच हजार मास्क, सैनीटायझर वाटप करण्यामागची भूमिका स्पष्ट केली. आपल्या अध्यक्षीय समारोपात प्रवीण साले यांनी कोरोना

लॉकडाऊन च्या काळात भाजपतर्फे केलेल्या कार्याची माहिती दिली. उपक्रमासाठी सहकार्य करणारे योगेश जैस्वाल, अनिल तोष्णीवाल, राजेशसिंह ठाकूर, वसीम बाबुशेठ, किशोर नोमुलवार यांचा शाल व पुष्पहार टाकून सन्मान करण्यात आला. सकाळी हनुमानपेठ येथील मुथा चौकात देखील तीन झोनच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना लंगर साहिब गुरुद्वाराचे हरिसिंघबाबा ,हरिष ठक्कर, अनिलसिंह हजारी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष श्रीराज चक्रावार, सोशल मीडिया जिल्हा संयोजक राज यादव, व्यापारी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रुपेश व्यास, सोनू उपाध्याय यांच्या हस्ते मास्क, सॅनिटायझर वाटप करण्यात आले होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष भारती, राजेशसिंह ठाकूर, सदाशिव कंधारे, जगतसिंग ठाकूर खैरगाववाले, स्वच्छता निरीक्षक मोहन लांडगे, मुदीराज, रोडे व नईमखान, दिगंबर आंबटवार, राजेश नागरिया, उद्धव हिंगोले, महेंद्र कांबळे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *