आय.एम.ए.ने पुकारलेल्या संपामध्ये सहभागी होणार नसल्याचे दिले निवेदन
कंधारः- (डॉ.माधव कुद्रे)
भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने घेतलेल्या निर्णयाच्या समर्थनार्थ कंधार शहरातील आयुष डॉक्टरांनी शुक्रवार दि.११ डिसेंबर २०२० रोजी गुलाबी फित लावून वैद्यकीय सेवा दिली. तसेच या निर्णयाच्या विरोधात आय.एम.ए.ने पुकारलेल्या संपामध्ये सहभागी होणार नसल्याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी व तहसिलदार, कंधार यांना देण्यात आले.
भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने शल्य व शालाक्यतंत्र विषयाच्या पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांच्या शस्त्रक्रियेच्या अधिकारासंबंधी स्पष्टता देणारे राजपत्र नुकतेच प्रकाशित केले. या निर्णयाच्या समर्थनार्थ कंधार शहरातील आयुष डॉक्टरांनी शुक्रवार दि.११ डिसेंबर २०२० रोजी गुलाबी फित लावून वैद्यकीय सेवा दिली. तसेच या निर्णयाच्या विरोधात आय.एम.ए.ने पुकारलेल्या संपामध्ये सहभागी होणार नसल्याबाबतचे निवेदन उपजिल्हाधिकारी व तहसिलदार, कंधार यांना देण्यात आले. या निवेदनाच्या प्रती आयुषमंत्री, भारत सरकार, आयुष सचिव, आयुषमंत्रालय, भारत सरकार, सेन्ट्रल कॉन्सील अॉफ इंडियन मेडिसीन यांना माहितीस्तव पाठविण्यात आल्या. या निवेदनावर निमा कंधार तालुका अध्यक्ष डॉ.यशवंत तेलंग, डॉ.राजेश गुट्टे, डॉ.अरुण कुरुडे, डॉ.दिपक बडवणे, डॉ.बालाजी मद्रेवार, डॉ.लक्ष्मण जायभाये, डॉ.राम तायडे, डॉ.दिपाली तायडे, डॉ.माधव कुद्रे, डॉ.बळीराम बगाडे, डॉ.अर्चना जाधव, डॉ.राजेश्वर पांचाळ, डॉ.कैलास फाजगे, डॉ.बालाजी कागणे, डॉ.संगिता कागणे, डॉ.प्रकाश सादलापूरे, डॉ.भगवान वाघमारे, डॉ.दिपाली वाघमारे, डॉ.राम फुलवळे, डॉ.सुचिता फाजगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.