कंधार येथे भैय्यासाहेब आंबेडकरांना अभिवादन;

मान्यवरांच्या हस्ते शॉपिंग सेंटर पायाभरणी भूमी पूजन संपन्न

कंधार (प्रतिनिधी)
सूर्यपुत्र महापंडीत काश्यप यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त भारतीय बौध्द महासभा ता.शाखा कंधारच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सूर्यपुत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले,तर समता सैनिक दलाच्या वतीने त्यांना मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले.


भैय्यासाहेब आंबेडकर स्मारक भीमगड येथे महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या १०८ व्या जयंतीचे आयोजन भीमगड येथे करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध,महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर व यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शॉपिंग सेंटर पायाभरणीचे भूमी पूजन करण्यात आले.यावेळी सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.तर इंजिनियर प्रदीप ढवळे यांनी भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकुन मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर भदंत विनय बोधी प्रिय यांनी उपस्थितांना दानाचे महत्व या विषयावर व्याख्यान दिले.
यावेळी नांदेड जिल्हा भारतीय बौध्द महासभा दक्षिणचे अध्यक्ष पी.एम.वाघमारे,तालुकाध्यक्ष विलास कांबळे,नामदेव कांबळे,कोषाध्यक्ष जितेंद्र ढवळे,निलेश गायकवाड,माजी नागराध्यक्ष दगडूभाऊ सोनकांबळे,बी.सी.कांबळे आर.एन.गायकवाड,पा.पी.ढवळे,एन,के,ढवळे,माजी तालुका अध्यक्ष दिलीप जोंधळे,सौ,रमाताई कठारे,सौ.प्रीया भोसले,सौ. वंदना दुमने,नाना गायकवाड,सौ.वर्षा कांबळे,पांडुरंग सोनकांबळे,देशमुख,ऍड.मारोती सोनकांबळे,संजय सोनकांबळे व पत्रकारसह उपासक-उपासिकानी भैय्यासाहेब आंबेडकर स्मारकास पुष्पअर्पण करून अभिवादन केले.समता सैनिकानी मानवंदना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *