शरद पवारांना मोदी नावाचे घोंगावते वादळ थोपविता येईल काय ?

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं नाव कधी राष्ट्रपतीपदासाठी तर कधी पंतप्रधानपदासाठी कायम चर्चेत असतं. शरद पवार राष्ट्रपती होतील असा विश्वास नुकताच संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. आता पवारांच्या नातवानं त्याचं नाव पंतप्रधानपदासाठी पुन्हा चर्चेत आणलंय. महाविकास आघाडीनं २०२४ ची लोकसभा निवडणूक एकत्र लढवली तर शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात असं वक्तव्य शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी केलंय.

औरंगाबादमधल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शरद पवार यांचा लढावूपणा उभ्या देशानं पाहिला. आपलं अजून वय झालेलं नसून आपण आजही मैदानात आहोत असं मांडी थोपटून पवार आपल्या विरोधकांना आव्हान देत असतात. तोच धागा पकडत राहित पवार यांनी शरद पवार यांच्याबद्दल हे वक्तव्य केलंय.

“साहेब अजूनही तरुण आहेत. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढलो तर मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रासारखीच महाविकास आघाडी देशातही झाली तर आपण पाहिलेलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांशी मोट बांधली जावी, असा आग्रह काँग्रेसने धरला आहे. विशेष म्हणजे शरद पवारांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याचीही काँग्रेसची तयारी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याऐवजी यूपीएचे अध्यक्षपद शरद पवार स्वीकारणार का, पंतप्रधानपदावर दावेदारी सांगण्याची काँग्रेसची मागणी पवार मान्य करणार का, याकडे सर्वसामान्यांचंही लक्ष लागलं आहे.

आजच्या घडीला राष्ट्रीय पातळीवर विरोधकांना एकजूट करणं आवश्यक आहे आणि त्या दिशेने मी काम करत आहे, असं शरद पवार यांनी आधीच सांगितलं होतं. विरोधकांचा नेता कोण होईल, हा प्रश्न नाही, तर आधी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण आहे, जनता कंटाळलेली आहे. मजूर, शेतकरी यांच्यामध्ये सरकारविरोधात रोष आहे, त्यामुळे विरोधक एकजूट झाले आणि मतविभाजन टाळलं तर सत्ता परिवर्तन निश्चित आहे. त्या दिशेने शरद पवारांचं काम सुरु आहे” असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

“शरद पवार यांनी पंतप्रधानपदाची इच्छा व्यक्त केलेली नाही. यूपीएचं अध्यक्षपद किंवा विरोधी पक्षांचा नेता कोण होणार, हा सध्या विषय नाही, त्याबाबत सर्व जण मिळून निर्णय घेतील. विधान परिषदेच्या निकालांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारला महाराष्ट्राने स्वीकृती दिली आहे. त्यामुळे देशातही हा प्रयोग झाला, तर स्वीकारलं जाईल. जनतेला चांगला पर्याय दिल्यास सत्तांतर निश्चित आहे” असंही नवाब मलिक म्हणाले.

“यूपीएचे अध्यक्ष कोण व्हावं, हा त्यांचा अंतर्गत मामला आहे. त्यावर भाजपला भाष्य करण्याची गरज नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश वेगाने प्रगती करत आहे. कोणीही कितीही सत्याची भूमिका घेतली तरी जनता साथ देईल, असं वाटत नाही. जो काम करतो, राष्ट्रहितासाठी सर्वस्व पणाला लावतो, ज्याला परिवाराची चिंता नसते, तो नेता देशाला हवा आहे. कितीही जण एकत्र आले तरी उपयोग नाही. त्यांना इंजिनची क्षमता वाढवावी लागेल. जे पक्ष एकजूट करत आहेत, ते आपापल्या भागात जनतेच्या नजरेतून उतरले आहेत. महाराष्ट्रातही विश्वासघाताची मोट बांधून सरकार स्थापन केलं. धोका निर्माण करणे म्हणजे पराक्रम नाही”
अशा शब्दात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केलं आहे.

“महाराष्ट्रात भाजपची कोंडी केली, तसा प्रयोग देशातही होऊ शकतो. यूपीएचं अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे आहे. पण त्यांचं वय आणि प्रकृती पाहता, आगामी लोकसभा निवडणुकीपर्यंत ते त्यांना झेपणारं नसेल. राहुल गांधी यांच्याकडे सूत्र देण्याऐवजी क्रमांक दोनवर ठेवणं पसंत केलं जाईल. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, वयाच्या ऐंशीव्या वर्षीही कार्यक्षम आहेत. विरोधातील सर्वच पक्षांशी त्यांचे उत्तम संबंध आहेत. त्यांची राजकीय परिपक्वता, मास बेस, सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा पाहता शरद पवार हा योग्य पर्याय ठरेल. अमेरिकेच्या अध्यक्षपदी ७८ वर्षांचे ज्यो बायडेन असतील, तर शरद पवार केंद्रीय पातळीवर नेतृत्वाची धुरा घेऊ शकतात, असं मत ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी व्यक्त केलं.

संबंधीचा प्रस्ताव शरद पवार यांना दिल्याची माहिती आहे. विरोधी पक्षाला एकत्र करुन आगामी लोकसभा निवडणुकीचं नेतृत्व करावं, असा प्रस्ताव काँग्रेसने दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर शरद पवार यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याची तयारीही काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष करत आहेत, अशी माहिती विरोधीपक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली. पुढील लोकसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांना थेट पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उतरवण्याऐवजी शरद पवार यांच्यासारखा अनुभवी चेहरा देण्याचा काँग्रेसचा प्लान दिसत आहे. शरद पवार यांच्याकडे असलेले नेतृत्वगुण, दांडगा अनुभव, विरोधी पक्षांची मोट बांधण्याची क्षमता याचा फायदा करुन घेण्याचा काँग्रेसचा इरादा असावा.

महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारसरणीच्या पक्षांचं वर्षभरात चांगलंच गूळपीठ जमल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त तिन्ही पक्षांनी पाचच नव्हे, तर पंचवीस वर्ष सत्तेत एकत्र राहण्याचा मानस बोलून दाखवला. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावरही अशाच प्रकारे विरोधी पक्षांशी मोट बांधली जावी, यासाठी काँग्रेसने गळ घातली आहे. विशेष म्हणजे शरद पवारांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याचीही त्यांची तयारी आहे.

शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रासारखी महाविकास आघाडी केंद्रीय स्तरावर करण्याची मागणी केली जात आहे. काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी या संबंधीचा प्रस्ताव शरद पवार यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विरोधी पक्षाला एकत्र करुन आगामी लोकसभा निवडणुकीचं नेतृत्व करावं, असा प्रस्ताव काँग्रेसने दिला आहे.


शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कृषी कायदा रद्द करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर शरद पवार यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्याची तयारीही काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष करत आहेत, अशी माहिती विरोधीपक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली. विरोधी पक्षांचे नेते अमेरिकेतील जो बायडन थेरपी भारतात लागू करण्याची तयारी करत आहेत.

लोकसभा निवडणुकांना साडेतीन वर्षांचा अवकाश
पुढील लोकसभा निवडणुका २०२४ मध्ये होणार आहेत. म्हणजेच साडेतीन वर्षांचा अवकाश आहे. साधारण सहा महिने ते एक वर्ष आधीपासून निवडणुकांची मोर्चेबांधणी सुरु होते. मात्र गेली सहा वर्ष सत्तेपासून दूर राहिलेली काँग्रेस आतापासूनच तयारीला लागलेली दिसते. गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांना काँग्रेसकडून पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करण्यात आले होते. २०१९ ची लोकसभा निवडणूक ही नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढली गेली. मात्र नवख्या राहुल गांधींचा अनुभवी मोदींसमोर टिकाव लागला नाही आणि लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले. यथावकाश राहुल गांधीही अध्यक्षपदावरुन पायउतार झाले.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार माढा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होते. मात्र त्याच वेळी पार्थ पवार यांनीही लोकसभा निवडणुकीत उतरण्याची इच्छा व्यक्त केली. एकाच कुटुंबातील अनेक व्यक्तींना तिकीट दिले तर चुकीचा संदेश जाईल आणि कार्यकर्ते नाराज होतील, असे मत पवारांनी त्यावेळी व्यक्त केले. सुप्रिया सुळे यांनी निवडणूक लढवणे निश्चित झाले होते. त्यामुळे नातवाच्या हट्टापायी पवार आजोबांनी निवडणुकीतून माघार घेतली. परंतु पार्थ यांच्या पदरी यश पडले नाही. त्यानंतर यावर्षी पवार राज्यसभेवर निवडून आले. या सगळ्या प्रकारांनी जनतेला काय तो द्यायचा तो संदेश दिला.

आता शरद पवार यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माकप नेते सीताराम येचुरी, भाकप नेते डी. राजा, द्रमुक नेते टीकेएस एलानगोवन या विरोधीपक्षातील दिग्गजांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी देशात पेटलेल्या शेतकरी आंदोलनावर राष्ट्रपतींसोबत चर्चा केली. कृषी कायदे रद्द करण्यासाठी सरकारला निर्देशित करण्याबाबत हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी केली. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे यूपीए अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात येणार असल्याच्या बातम्यांनी १० डिसेंबरचा गुरुवार दिवस चर्चेत राहिला. महाराष्ट्रात वर्षभरापूर्वी जो करिश्मा शरद पवारांनी केला तोच करिश्मा देशपातळीवर पवारांनी करावा, याचाच भाग म्हणून पवारांकडे यूपीएचं अध्यक्षपद जाणार असल्याच्या बातम्या आल्या. मात्र या बातमीत तथ्य नसल्याचं स्पष्ट करत पवारांनी चर्चेतील हवा काढून घेतली. पवारांच्या UPA अध्यक्षपदाच्या चर्चेपाठीमागे काँग्रेस नेते राहुल गांधींविरोधात मोठं षडयंत्र रचलं जात असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला आहे.

“दिल्लीपासून मुंबईपर्यंत राहुल गांधी यांच्या विरोधात जे अभियान सुरु आहे त्याचाच भाग म्हणजे पवारांच्या UPA अध्यक्षपदाच्या चर्चा”, असं खळबळ उडवून देणारं ट्विट निरुपम यांनी केलं आहे. याच अभियानाच्या अंतर्गत २३ सह्यांचं पत्र लिहिलं गेलं होतं, असंही निरुपम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. वारंवार काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यामधल्या उणीवा दाखवण्याचं काम एक ठराविक वर्ग करतो आहे. काँग्रेस मिटवण्याचा एक मोठा प्लॅन चालू आहे”, असं मोठं विधान आपल्या ट्विटमधून संजय निरुपम यांनी केलं आहे. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये नेतृत्वबदल केला जावा किंवा खांदेपालट व्हावी, म्हणून काँग्रेसच्या २३ नेत्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना सविस्तर पत्र लिहिलं होतं. काँग्रेसमध्ये मोठ्या फेरबदलाची आवश्यकता असल्याचं त्यांनी या पत्रामधून अधोरेकित केलं होतं. काँग्रेस नेत्यांनी ऑगस्ट महिन्यात हे पत्र सोनिया गांधींना पाठवलं होतं.

एकप्रकारे काँग्रेसमधील अशी नावे ज्यांना गांधी घराण्याशिवाय दुसऱ्या कोणाच्या तरी हातात पक्षाची सुत्रे जावी वाटतात, अशा नेत्यांनीच शरद पवार यांच्या यूपीएचे अध्यक्षपदाच्या चर्चा घडवल्या, असाच निरुपम यांच्या म्हणण्याचा मतितार्थ होतो.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिब्बल, मनिष तिवारी, शशी थरुर, विवेक टंका, मुकुल वासनिक, जितिन प्रसाद, भूपिंदर सिंह हुडा, राजिंदर कौर भट्टल, वीरप्पा मोईली, पृथ्वीराज चव्हाण, पी.जे. कुरियन, रेणूका चौधरी, मिलिंद देवरा, राज बब्बर, अरविंदर सिंह लवली, कौल सिंह ठाकूर, अखिलेश प्रसाद सिंग, कुलदीप शर्मा, योगानंद शास्त्री, संदीप दीक्षित या नेत्यांच्या सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्रावर सह्या होत्या.

राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं विरोधक एकत्र येताना दिसत आहेत. याच विरोधी पक्षांचं नेतृत्व शरद पवार करणार असल्याच्या बातम्या दिवसभर माध्यमांधून देण्यात आल्या. मात्र UPA चं प्रमुखपद मी स्वीकारणार असल्याच्या चर्चा तथ्यहीन आहेत, असं पवार म्हणाले होते. महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारसरणीच्या पक्षांची वर्षभरात चांगलीच गट्टी जमली. राष्ट्रीय स्तरावरही विरोधी अश्याच प्रकारे पक्षांशी मोट बांधली जावी, याकरिता सोनिया गांधी शरद पवारांकडे यूपीएचे अध्यक्षपद सोपवू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. महाराष्ट्रातला कित्ता दिल्लीतही गिरवला जावा आणि केंद्रामधलं सरकार सत्तेच्या खाली खेचावं, हे सगळं प्लॅनिंग पवारांकडे देण्याचं नियोजन सोनिया यांचं असल्याचं बोललं गेलं. मात्र “या सगळ्या चर्चा आहेत. यूपीएच्या अध्यक्षपदाच्या संदर्भामध्ये कोणतंही तथ्य नाही”, असं दस्तुरखुद्द शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

राजधानी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं विरोधक एकत्र येताना दिसत आहेत. याच विरोधी पक्षांचं नेतृत्व शरद पवार करणार असल्याच्या बातम्या दिवसभर माध्यमांधून देण्यात आल्या. मात्र UPA चं प्रमुखपद मी स्वीकारणार असल्याच्या चर्चा तथ्यहीन आहेत, असं पवार म्हणाले. यूपीएचा अध्यक्ष हा सर्वात मोठ्या पक्षातूनच होत असतो. काँग्रेस जेव्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला होता, तेव्हा यूपीएची स्थापना झाली होती. आजही काँग्रेसच सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसकडे खासदारांचं सर्वाधिक बळ आहे. त्यामुळे यूपीएचा अध्यक्षही काँग्रेसमधूनच होईल यात शंका नाही. आता ज्या पद्धतीने बातम्या सुरू आहेत, त्या आम्ही नाकारत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

मीडिया रिपोर्टनुसार, सोनिया गांधी यांच्याकडून यूपीएचं चेअरमनपद पवारांना दिलं जाऊ शकतं. त्याबाबतची प्राथमिक चर्चाही झाली आहे. दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुका आणि हैदराबाद पालिका निवडणुकीनंतर पुन्हा एकदा काँग्रेसचं नेतृत्व राहुल गांधी यांच्याकडे सोपवण्याची मागणी होत आहे. राहुल यांनी मात्र ही मागणी फेटाळून लावली आहे.

पवारांकडे यूपीएच्या चेअरमनपदाची सूत्रे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच राष्ट्रवादीने मात्र त्यावर सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आजच्या घडीला राष्ट्रीय पातळीवर विरोधकांना एकजूट करणं आवश्यक आहे आणि त्या दिशेने मी काम करत आहे, असं शरद पवार यांनी आधीच सांगितलं होतं. विरोधकांचा नेता कोण होईल, हा प्रश्न नाही, तर आधी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण आहे, जनता कंटाळलेली आहे. मजूर, शेतकरी यांच्यामध्ये सरकारविरोधात रोष आहे, त्यामुळे विरोधक एकजूट झाले आणि मतविभाजन टाळलं तर सत्ता परिवर्तन निश्चित आहे. त्या दिशेने शरद पवारांचं काम सुरु आहे” असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.

पवारांकडे यूपीएच्या चेअरमनपदाची सूत्रे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच राष्ट्रवादीने मात्र त्यावर सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आजच्या घडीला राष्ट्रीय पातळीवर विरोधकांना एकजूट करणं आवश्यक आहे आणि त्या दिशेने मी काम करत आहे, असं शरद पवार यांनी आधीच सांगितलं होतं. विरोधकांचा नेता कोण होईल, हा प्रश्न नाही, तर आधी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण आहे, जनता कंटाळलेली आहे. मजूर, शेतकरी यांच्यामध्ये सरकारविरोधात रोष आहे, त्यामुळे विरोधक एकजूट झाले आणि मतविभाजन टाळलं तर सत्ता परिवर्तन निश्चित आहे. त्या दिशेने शरद पवारांचं काम सुरु आहे” असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र या चर्चेवर टीका केली आहे. पवारांकडे यूपीएचं नेतृत्व जाणं म्हणजे सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवण्यासारखं आहे, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे. सलग दुसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आलेलं अपयश, काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मतदारांनी नाकारणं, काँग्रेसकडे असलेली नेतृत्वाची वाणवा आणि त्यातच विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुरू केलेले प्रयत्न या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शरद पवार पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरले आहेत. पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षांची मोट बांधली जावी, अशी अपेक्षाच काँग्रेसने व्यक्त केली आहे. त्यामुळे उद्या काँग्रेससह तिसऱ्या आघाडीने पवारांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलंच तर महाराष्ट्रात जो चमत्कार घडला, तोच चमत्कार ते देश पातळीवर करतील काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशपातळीवरील सक्षम पर्याय म्हणूनही शरद पवारांकडे पाहिले जात आहे. पवारांचे राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रात ज्या पद्धतीने कट्टर हिंदुत्ववादी पक्ष असलेल्या शिवसेनेला मोठ्या शिताफिने भाजपपासून दूर करून संयुक्त पुरोगामी आघाडीत घेतले, तसाच चमत्कार ते देशपातळीवरही घडवून आणू शकतात, असा विश्वास वाटू लागल्यानेच त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे करण्याची खेळी आता राष्ट्रीय स्तरावर होताना दिसत आहे.

महाराष्ट्रात २०१९ ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संयुक्तपणे लढवली. तर शिवसेना आणि भाजपनेही युती करून ही निवडणूक लढवली. मात्र, विधानसभा निवडणूक निकालानंतर बंद दाराआड झालेल्या चर्चेचा हवाला देत शिवसेनेने भाजपकडे मुख्यमंत्रीपदाची मागणी केली. या निवडणुकीत १०५ जागा मिळविलेल्या भाजपने अवघ्या ५६ जागांवर निवडून आलेल्या शिवसेनेला मुख्यमंत्रीपद सोडण्यास स्पष्ट नकार दिला. आपल्या मागे फरफटत येण्याशिवाय शिवसेनेला पर्यायच नाही, शिवसेना कधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊ शकत नाही, या मानसिकतेत भाजप होती. एकवेळ शिवसेना राष्ट्रवादीसोबत जाईल, पण काँग्रेस कधीच शिवसेनेशी हात मिळवणी करणार नाही. त्यामुळे आपण देऊ ते आणि सांगू तसंच असंच शिवसेनेला वागावं लागेल, असं भाजपला वाटत होतं.

मात्र, दुसरीकडे शरद पवार यांनी शिवसेनेची अस्वस्थता नेमकी हेरली आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या माध्यमातून आघाडीचं घोडं दामटवण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना विश्वासात घेतलं. त्यानंतर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे सल्लागार अहमद पटेल यांच्याशी चर्चा केली आणि शिवसेनेशी आघाडी करण्याची गरज, भाजपचं वाढतं आव्हान पटवून देत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना या नव्या राजकीय समीकरणासाठी राजी केलं. त्यानंतर सत्तेचा फॉर्म्युला ठरला आणि अशक्य वाटणारं तसेच सर्वांनाच अचंबित करणारं नवं राजकीय समीकरण राज्यात निर्माण झालं. या नव्या समीकरणास काँग्रेस आणि शिवसेनेने साथ दिली असली तरी त्यामागचा मुख्य ब्रेन हा पवारांचाच होता.

आज बसपाच्या अध्यक्षा मायावती, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, तिकडे आंध्र प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे काँग्रेससोबत जायला तयार नाहीत. शिवाय डावेही काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारण्यास तयार नाहीत. अशावेळी या सर्व पक्षांना पवारच एकत्र आणू शकतात. या सर्व पक्षांच्या नेत्यांशी पवारांचे चांगले संबंध आहेत. त्यांना राजकीय परिस्थिती पटवून देण्याची कला पवारांना अवगत असल्याने त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यास महाराष्ट्रा सारखा चमत्कार ते देशपातळीवर नक्कीच घडवून आणू शकतात, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

शरद पवार हे भारतीय राजकारणातील चाणक्य समजले जातात. राजकीय हवा कोणत्या दिशेने जात आहे, याचा अचूक अंदाज त्यांना येतो. त्यामुळे त्यांची राजकीय गणितंही त्याच दिशेने सुरू असतात. पवारांकडे राजकीय अंदाज घेण्याचं असलेलं कसबही त्यांना पंतप्रधानपदापर्यंत पोहोचवू शकतं, असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. शिवाय पक्षांतर्गत होणारी बंडाळी, राजकीय भूकंप याचं व्यवस्थापन करण्यातही ते तरबेज आहेत. त्यामुळे ते पंतप्रधान झाल्यास त्याचा त्यांना फायदाच होऊ शकतो, असं जाणकार सांगतात.

पवार केवळ विरोधी पक्षातच नव्हे तर सत्ताधारी पक्षातही तेवढेच लोकप्रिय आहेत. देशात कोणतीही समस्या उद्भवली तर आजही केंद्रातील आणि राज्यांमधील नेते त्यांचा सल्ला घेतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी तर पवारांना गुरु मानतात. पवारांचे बोट पकडून मी राजकारणात आलोय असं जाहीर वक्तव्यही मोदी यांनी केलं होतं. त्यावरून पवारांचं राजकीय वजन किती आहे हे दिसून येतं.

देशातील राजकारण, ग्रामीण जीवन, उद्योग व्यवसाय, शेती, संरक्षण आणि परराष्ट्र धोरण यांचा अभ्यास असलेल्या देशातील मोजक्या नेत्यांपैकी पवार हे एक नेते आहेत. देशात एवढा अभ्यासू आणि अनुभवी नेता नाही. त्यामुळे ते पंतप्रधानपदाचे उमेदवार झाल्यास त्यांना सर्वच राजकीय पक्षातून पाठिंबा मिळू शकतो. मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, शरद यादव आदी नेते अभ्यासू असले तरी आता ते राजकारणात सक्रिय नाहीत. पवार वयाच्या ऐंशीव्या वर्षीही राजकारणात सक्रिय असून ही त्यांची जमेची बाजू असल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीमध्ये राहुल गांधी यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी राहुल गांधी यांचं नेतृत्व नाकारलं. त्यांच्या राजकीय अनुभवावरून त्यांच्यावर नेहमीच टीका केली गेली. सोनिया गांधी या सुद्धा आजारी असतात. प्रियांका गांधी या अजूनही संसदीय राजकारणात नाहीत. काँग्रेसमधील बुजुर्ग नेत्यांना मतदार कधीच स्वीकारणार नाहीत. तसेच विरोधी पक्षात मायावती, ममता बॅनर्जी, मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, सीताराम येचुरी, शरद यादव आदी नेत्यांना म्हणावा तसा जनाधार राहिलेला नाही. मोदींसमोर लागणारं मास अपिलिंगही या नेत्यांकडे नाही. त्या तुलनेत पवारांचा जनाधार मोठा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर गोवा, गुजरात आणि उत्तर प्रदेशात दखलपात्रं आहे. शिवाय पवारांना संपूर्ण देश ओळखतो. अभ्यासू, जाणता नेता म्हणून त्यांची ख्याती आहे. शिवाय देशपातळीवर सर्व पक्षांची मोट बांधू शकेल असे पवार हे एकमेव नेते आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत पवार हे पंतप्रधानपदाचे उमदेवार म्हणून घोषित झाल्यास राष्ट्रीय पातळीवर मोठा चमत्कार घडू शकतो. पवारांच्या माध्यामातून तगडं आव्हान उभं राहू शकतं, असं राजकीय अभ्यासक सांगतात.

राजकारणाच्या हवेचा अंदाज असलेल्या पवारांनी मोदींचा केंद्रीय राजकारणात उदय होताच तिसऱ्या आघाडी निर्माण करण्याची गरज व्यक्त केली होती. मोदी लाटेमुळे काँग्रेस इतक्यात सत्तेत येऊ शकत नसल्याचा अंदाज आल्याने त्यांनी २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तिसऱ्या आघाडीची मोट बांधण्यास सुरुवातही केली होती. परंतु, काँग्रेसला आपणच सत्तेत येऊ असे वाटल्याने जागा वाटपांमध्ये आघाडीचं गणित फिसकटलं. शिवाय काँग्रेसने पंतप्रधानपदाचा उमेदवारही जाहीर केला नाही. त्यामुळेही आघाडीचं घोडं गंगेत न्हालं नाही. पुढे पवारांनी राष्ट्रीय स्तरावर आघाडी होत नसेल तर प्रादेशिक स्तरावर काँग्रेसने सर्व पक्षांशी आघाडी करून भाजपला थोपवावं, असा पर्यायही त्यांनी सूचवला होता. पण ते प्रत्यक्षात येऊ शकलं नाही.

पवारांना पंतप्रधानपदाचे उमदेवार म्हणून घोषित केल्यास त्यांना सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणण्याचं कसब पणाला लागेल. महाराष्ट्रात जो प्रयोग झाला, त्याचाच कित्ता राष्ट्रीय पातळीवर गिरवण्यासाठी त्यांना त्यांचे वजन खर्ची घालावे लागेल. अशावेळी राष्ट्रीय स्तरावर भाजपविरोधात एक भक्कम आघाडी तयार करणं किंवा प्रादेशिक स्तरावर जो पक्ष मजबूत असेल त्या पक्षाच्या नेतृत्वात सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपविरोधात भक्कम लढत उभी करणं, हे दोन प्रयोग पवारांकडून राबवले जाऊ शकतात, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.

पवारांनी राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकत्र आणण्याचा प्रयोग केला. राज्यात नवी समीकरणं निर्माण झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण राजकीय प्रयोग करणं पवारांसाठी तसं नवं राहिलेलं नाही. १९७८ मध्ये काँग्रेसमध्ये असलेल्या पवारांनी पहिल्यांदाच ‘पुलोद’चा प्रयोग करून राजकीय निरीक्षकांना बुचकाळ्यात पाडलं होतं. त्यावेळी पवार हे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री होते. त्यावेळी अधिवेशन सुरू असतानाच काँग्रेसमध्ये फूट पडली होती. त्यावेळी पवारांसोबत 38 आमदार बाहेर पडले. पवारांनी दादासाहेब रुपवते यांच्यासोबत ‘समांतर काँग्रेस’ या नव्या पक्षाची स्थापना केली. अधिवेशनात राजकीय घडामोडी घडत असतानाच वसंतदादांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पवार विधिमंडळात जनता पक्षाबरोबरच्या बैठकीत सामिल झाले. त्यावेळी चंद्रशेखर आणि एस. एम. जोशी यांनी पवारांकडे नव्या सरकारची सूत्रं देण्याची घोषणा केली आणि राज्यात ‘पुरोगामी लोकशाही दला’ची (पुलोद) स्थापना झाली.

पवारांनी पुलोदच्या प्रयोगात राज्याच्या राजकारणात कधी न झालेल्या गोष्टी केल्या. राज्यात पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी सरकार आणण्याबरोबरच जनता पक्ष, शेकाप आणि कम्युनिस्ट पक्षांनाही त्यांनी सोबत घेतलं. या प्रयोगामुळे पवार पॉवरफुल नेते म्हणून उदयाला आले. १९९९ मध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पंतप्रधानपदास भाजपने विरोध केला होता. त्यावेळी त्यांच्या विदेशीत्वाचा मुद्दा उचलण्यात आला होता. त्यामुळे पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून लोकभावना कळवली. पण पक्षाने या तिन्ही नेत्यांना काँग्रेसमधून निलंबित केले. त्यामुळे पवारांनी राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करून घवघवीत यश मिळविले. काँग्रेसलाही राज्यात चांगलं यश मिळालं. पण राष्ट्रवादीशी आघाडी केल्याशिवाय सत्तेत बसणं शक्य नसल्याने काँग्रेसला राष्ट्रवादीसोबत घरोबा करण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे आधी राष्ट्रवादीचा प्रयोग आणि नंतर काँग्रेसशी पर्यायाने सोनिया गांधींशी जुळवून घेण्याचं कसबही पवारांनी करून दाखवलं.

पवार हे संधीसाधू नेते आहेत. ते बोलतात एक आणि करतात वेगळं असं नेहमी बोललं जातं. त्यामुळे त्यांच्या विश्वासहार्यतेचीही राजकारणात चर्चा होत असते. पण असं असलं तरी पवारांना टाळून देशाचं राजकारण कुणालाही करणं शक्य नाही. पवारांचं महत्त्व, अभ्यास, प्रश्नांची जाण, त्यावरील असलेली अचूक तोड आणि राजकारण कोणत्या दिशेला जाईल, याचा अंदाज त्यांना असल्याने पवारांचं केंद्रीय राजकारणातील महत्त्व अबाधित असल्याचंही राजकीय निरीक्षक सांगतात.

खरं तर काँग्रेसकडे मोदी नावाच्या घोंगावत्या वादळाला रोखण्यासाठी खरं तर नेतृत्वच नाही. काँग्रेस गांधी नावाशिवाय कल्पना करणंही शक्य असू शकत नाही. आत्तापर्यंतच्या वर्तमानाच्या अनुमानावरुन गांधी घराण्याच्या वर्तुळातून कांग्रेस बाहेर पडणार नसेल तर काँग्रेस स्वत:चे पानीपत करुन घेत आहे, हे एखादं शेंबडं कारटं देखील सांगू शकेल. मोदी आणि शहा यांच्या कूटनीतीपुढे दिग्गज राजकारण्यांचा टीकाव लागत नाही, असे नेहमीचे चित्र आहे. आता भाजपाला रोखण्यासाठी शरद पवार यांना संपुआचे नेतृत्व सोपवले तर? हा विचार कांग्रेसच्या मनात येऊ शकतो. किंबहुना तो आला आहे. कारण मोदींच्या तुलनेत सक्षम नेतृत्व आतातरी काँग्रेसकडे नाही. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्रात त्यांनी पहिलवानकी केली. संपुआकडून त्यांचे नेतृत्व देशभर स्विकारले जाऊ शकते, असा विश्वास कांग्रेसला वाटत आहे.

राष्ट्रवादीत तर या विचाराचे चैतन्यच आहे. अब की बार शरद पवार म्हणणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता एक मराठी माणूस दिल्लीच्या तख्तावर जाऊन बसू शकत असेल तर महाराष्ट्रातील लहान-मोठे सुभेदार जिंकावे लागतील. महाराष्ट्राच्या बाहेर मोदी नावाच्या चौकीदाराचा बिमोड करण्याचेच लक्ष्य असल्याने शरद‌ पवार यांच्या सारख्या आणि तशा अनेक मुत्सद्दी व महत्त्वाकांक्षी नेत्यांचा वापर केला जात आहे ही भूमिकाही पसरवावी लागेल. गांधी घराण्याच्या नेतृत्वाविना कांग्रेस जन्म घेत असतांना घराणेप्रिय काँग्रेसजनांना थोडं वाईट वाटेल, परंतु हे कडू औषधाचा काढा प्यावाच लागेल. कारण काँग्रेसची प्रतिमा भाजपने मागील काही मुद्द्यांवरुन आणि चालू घडामोडींवरुन जितकी मलिन करता येईल, तितकी मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे.

‌सोनिया थकल्या आहेत किंवा त्यांच्यातील राजकीय इच्छाशक्ती कमी झाली आहे. राहुल गांधी पप्पु ते पप्पुच राहिले आहेत. त्यांचे नेतृत्व अपयशी ठरले आहेत. प्रियंका गांधी ह्या इंदिरा गांधी सारख्या दिसून उपयोग नाही. त्यांचा दुर्गावतार दिसणे आवश्यक होते पण ते शक्य दिसत नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. आता, पवारसाहेब हे संपुआचे नेतृत्व करणार की नाही हा काही प्रश्न नाही. ते करतील आणि करु शकतीलच. त्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनाच पुढाकार घ्यावा लागेल. तसेच पवार साहेबांची देशाचा पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेले नाही. मात्र एक मराठी माणूस देशाच्या प्रधानमंत्री पदावर बसू शकत असेल तर ह्या मराठी मुलखाने पराकाष्ठा का करु नये? याचा मराठी माणसाला अभिमानच वाटायला हवा. शरद पवार नावाच्या वाऱ्याची दिशा बोटांच्या खुणेनेच फिरवणाऱ्या जाणत्या राजाला मोदी नावाच्या घोंगावत्या वादळाला थोपावता येईल का, ते येणारा काळच ठरवेल.

गंगाधर ढवळे ,नांदेड

संपादकीय
१२.१२.२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *