डॉ.बाबासाहेब आंबेकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे अंतर्गत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षा निमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम संपन्न.
पुणे ;
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे अंतर्गत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षा निमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम१ ऑगस्ट ते ५ऑगस्टच्या दरम्यान गुगल झुम ॲपच्या माध्यमातून परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यानमाला घेण्यात आली .कंधार येथिल प्रा. भागवत गोरे व नांदेड येथील प्रसिद्ध साहित्यिक शिवा कांबळे यांनी सहभाग घेतला होता.
दि.५ रोजी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानीत शिवा कांबळे यांनी साहित्यरत्न अण्णााऊ साठे साहित्य: कर्तृत्व या विषयावर सखोल असे माहिती दिली.तसेच अण्णा भाऊच्या कादंबरी,चित्रपट ,आणि विपुल साहित्य यातून सामान्य माणसाला जीवन जगण्यास प्रेरणा देणाऱ्या ,परिस्थितीशी लढण्यास बळ देणाऱ्या ,सामाजिक आत्मभान ठेवणाऱ्या ,उल्लेखनीय विचारांचा उलगडा करण्यात आला.तसेच आण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली.सुमारे एक तास शिवा कांबळे यांनी अण्णा भाऊसाठे यांच्या कृतृत्वाची व कार्याचे विविध उदाहरणातून सादर केले.
त्याचबरोबर व्याख्यान मालेच्या दुसऱ्या सत्रात प्रा. भागवत गोरे यांनीही अण्णाभाऊ यांच्या जीवन कार्यावर माहिती दिली. अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातून सर्वसामान्य समाजातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे असल्याने या अनुभवांनी वास्तव चित्रण जे पाहिले आहे तेच रेखाटण्यात कार्य साहित्यातून केले असल्याचे प्रतिपादन यावेळी प्राध्यापक भागवत गोरे यांनी केले .या कार्यक्रमास सामाजिक न्याय व विशष सहाय्य विभागाचे मंत्री धनंजय मुडें, राज्यमंत्री विश्वजित कदम, प्रधान सचिव पराग जैन (भा.प्र. से) बार्टी चे महासंचालक कैलास कणसे , समतादुत प्रकल्पाच्या संचालिका प्रज्ञा वाघमारे , पुणे जिल्हा प्रकल्प अधिकारी शीतल बंडगर यांचे मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन सूत्रसंचालन ,आभार प्रदर्शन अनिता विठ्ठल दहिकांबळे यांनी केले.