रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करा! अन्यथा तीव्र आंदोलनाचा एमआयएम पक्षाचा इशारा
औरंगाबाद -(राहुल वानखेडे)
जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील बोरगाव ते देवगाव गंगापूर, कायगाव राज्य मार्ग क्रमांक ३९, गंगापूर ते मालुंजापर्यंतचे बंद पडलेले रस्त्याचे काम त्वरीत सुरू करुन सर्व काम अंदाजपत्रकानुसार न केल्यास तसेच आत्तापर्यंत झालेल्या निकृष्ट कामाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी गंगापूर एआयएमआयएम पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत त्वरीत दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बोरगाव ते देवगाव गंगापूर या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्या रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात अनेक वाहनधारकांना अपघातांना सामारे जावे लागत आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याचा तिढा सुटलेला नाही. गंगापूर ते लासूर साईटवर अक्षरशः माती टाकण्यात आली आहे. मालुंजा येथील शिवना नदीवरील पूल धोकादायक बनला आहे. या पुलाची थातुरमातुर डागडुजी करण्यात आली आहे. या रस्त्यावरून जाताना अनेकांना प्राण गमवावे लागले असून बऱ्याचजणांना अपंगत्व आले आहे. या संपूर्ण रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाला संबंधित गुत्तेदार जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत असेही निवेदनात म्हटले आहे.
अत्यंत संथ गतीने चाललेल्या, तसेच काही ठिकाणी बंद पडलेल्या, निकृष्ट दर्जाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून अंदाजपत्रकानुसार काम न झाल्यास गंगापूर एमआयएम पक्ष तीव्र आंदोलन करील असे उप अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग गंगापूर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर फैसल नासोलान, जुबेर पटेल, राहुल वानखेडे, अब्दुल सत्तार, इमरान खान, नदीम हाशमी, अश्फाक सय्यद, मुबिन शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.Attachments area