नांदेड – येथील सामाजिक चळवळी त अग्रेसर असलेल्या जिल्हा परिषद पतसंस्थेच्या संचालिका तथा कवयित्री छायाताई कांबळे यांना कर्मयोगी पुरस्कार मिळाल्याबद्दल सप्तरंगी साहित्य मंडळाकडून सत्कार करण्यात आला. यावेळी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष साहित्यिक अनुरत्न वाघमारे, उपाध्यक्ष ग्रामीण कवी नागोराव डोंगरे, महासचिव ज्येष्ठ कवी पांडूरंग कोकुलवार, कोषाध्यक्ष गंगाधर ढवळे, इंजि. दीपाश्री कांबळे यांची उपस्थिती होती.
सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने छायाताई कांबळे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या वतीने कांबळे यांना कर्मयोगी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याची दखल घेऊन साहित्य मंडळाकडून त्यांना बुक, बुके व पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले. कवयित्री छायाताई कांबळे ह्या कनिष्ठ सहाय्यक सामान्य प्रशासन विभागात कार्यरत आहेत. तसेच
ओंकार संघटनेच्या तसेच अनुसूचित जाती जमाती कर्मचारी महिला संघटना नांदेडच्या महिला जिल्हाध्यक्षा या पदांवर कार्यरत आहेत. त्यांना यापुर्वीही सावित्रीची लेक पुरस्कार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार,औरंगाबाद या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
सप्तरंगी साहित्य मंडळाचे कैलास धुतराज, मारोती कदम, शंकर गच्चे, प्रशांत गवळे, बाबुराव पाईकराव, रुपाली वैद्य वागरे, रणजीत गोणारकर, एकनाथ कार्लेकर, सुनील नरवाडे, पूजा ढवळे, शीतल भोरगे, विशालराज वाघमारे, प्रकाश ढवळे यांनी कांबळे यांना कर्मयोगी पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे आॅनलाईन पद्धतीने अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.