लोहा ,/ प्रतिनिधी
लोहा तहसीलचे पुरवठा विभागाचे कर्तव्यदक्ष पेशकार गणेशराव मोहीजे यांनी पुरवठा विभागाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध मान्यवरांनी सत्कार केला.
लोहा तहसील कार्यालयामध्ये गेल्या पाच वर्षापासून पुरवठा विभागाची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे पुरवठा विभागाचे पेशकार गणेशराव मोहिजे यांनी स्वस्त धान्य दुकानदार व लाभार्थी यांच्यात समन्वय घडून आणला अनेक लाभार्थ्यांचे ऑनलाइन करून त्याला धान्य उपलब्ध करून दिले तसेच ऑनलाईन प्रक्रियेमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट कार्य केले तसेच गोरगरीब नागरिकांना शिधापत्रिका मिळावी म्हणून सदैव सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ,
त्यांना मदत करणे अंत्योदय ,बीपीएल ,शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना महिन्याच्या महिन्याला धान्य उपलब्ध करून देणे स्वस्त धान्य दुकानदारांना आदेश देणे त्यांच्याशी समजणे वेळप्रसंगी कठोर कारवाई करणे आदी उत्कृष्ट सेवा बजावणारे लोहा तहसीलचे
पुरवठा विभागाचे कर्तव्यदक्ष पेशकार गणेशराव मोहिजे यांचा त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचा सत्कार शाल पुष्पहार घालून पेढे भरवून तहसीलदार विठ्ठल परळीकर, नायब तहसिलदार राम बोरगावकर,नायब तहसीलदार अशोक मोकले, स्वस्त धान्य संघटनेचे सुभाष पाटील पवार, प्रदिप पेनूरकर,दमकोंडवार, पत्रकार विलास सावळे, युनूस शेख, विनोद महाबळे, राष्ट्रवादीचे युवा नेते राम पाटील पवार, ठाकूर,निकम,धडेकर,नामपले, आदी मित्रमंडळीने केला.