कंधार/मो.सिकंदर
कंधार क्रिकेट प्रेमीयर लिग सिझन ६ चा अंतिम सामना सुर्या एलेव्ह संघाने चौधरी एलेव्हन संघास ९ विकेट ने हरवुन प्रथम पारीतोषिक २१ हजार रोख व चषक पटकावला आहे.
रॉयल क्रिकेट क्लब कंधार यांच्यावतीने गेल्या एक आठवड्या पासून कंधार प्रीमियर लीग ६ चे आयोजन श्री. शिवाजी सीनियर कॉलेज नवरंगपुरा क्रीडा संकुल या मैदानावर करण्यात आले होते.या टूर्नामेंट मध्ये एकूण ८ संघांनी सहभाग नोंदविला होता.
निलेश सिंह गौर यांचा सूर्या एलेव्हन व अहेमद चौधरी यांचा चौधरी ऐलेव्हन या संघामध्ये अंतिम सामना माजी जि.प.सदस्य पुरुषोत्तम धोंडगे व स्वप्नील पा.लु़गारे यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळवण्यात आले.प्रथम फलंदाजी करत चौधरी ऐलेव्हन संघाने १० घटकांमध्ये ८३ धावांचे आव्हान सुर्या एलेव्हन दिले होते सूर्य इलेव्हन या संघाने ८३ धावाचा लक्ष एक खेळाडू गमवत ९ .२ ओव्हरमध्ये पूर्ण करून कंधार प्रीमियर लीग ६ जिंकले. विजेत्या संघास श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी जि.प.सदस्य डॉ.पुरुषोत्तम धोंडगे यांच्या वतीने व त्यांच्याच हस्ते २१ हजार रुपये रोख व ट्राफी देण्यात आले तर उपविजेत्या संघास ११ हजार रुपये रोख स्वप्नील पाटील लुंगारे यांच्या वतीने देण्यात आले.
मॅन ऑफ द सिरीज महेश पा. भोसीकर यांच्यावतीने ३१००/ तर, टुर्लामेंटचा बेस्ट बॉलर म्हणून २१००/रुपये शेख साजिद कोहिनूर क्लासेस यांनी दिला.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.पुरुषोत्तम केशवराव धोंडगे,मा.जि.प.सदस्य बाबुराव पा.गिरे,स्वप्नील पा.लुंगारे, हे उपस्थित होते तर शेख शेरुभाई,अहेमद चौधरी, निलेश सिंह गौर,चुन्नु मास्टर,शेख आसेफ, खाजा पाशा सर,प्रा.शमशोद्दिन,धनराज पा.लुंगारे,शिवापा.मोरे,रईसोद्दिन पैलवान,मुजिब सेठ,कलीम अंसारी, सह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या टूर्नामेंट चे नियोजन रॉयल क्रिकेट क्लबचे ज्येष्ठ खेळाडू मिर्झा बेग व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.या वेळी हजारों प्रेक्षकांनी या कंधार प्रीमियर लीग आनंद घेतला.