लोहा ; प्रतिनिधी.
बिलोली येथील साठे नगरातील मूकबधिर मुलीवर काही नराधमांनी बलात्कार करून खून केला. या प्रकरणी सर्व नराधमांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्या अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा मानवहित लोकशाही पक्षाचे लोहा तालुकाध्यक्ष. शिवराज दाढेल लोहेकर यांनी लेखी निवेदनाद्वारे इशारा दिला आहे.या प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक नेते बाबुराव टोम्पे कुरुळेकर, जिल्हाप्रमुख मालोजीराजे वाघमारे, मातंग समाजाचे नेते मारुती कांबळे पेनुरकर, शिवहार गालफाडे, चंद्रशेखर राशीवंत, अजय भिसे माधव लोंढे, तानाजी पाटील ,डि.आर कंधारे हनुमंत कंधारे, अर्जुन नक्कलवाढ. राहुल भिसे स्वप्निल गव्हाणे.टी.के.दाढेल सर प्रा माधव भिसे सर यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोहा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दि.9. डिसेंबर 2020 रोजी साठे नगर बिलोली येथील मूकबधिर मुलीवर कांही नराधमांनी बलात्कार करून खून केला हे प्रकरण घडून खूप दिवस झाले परंतु अद्यापही सर्व आरोपींना अटक झाली नाही.पोलीस प्रशासन आरोपींना अटक करण्यास असमर्थ ठरले आहे या.खुन बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून 21 दिवसाच्या आत फाशीची शिक्षा द्यावी. सदर खटला खैरलांजीच्या धरतीवर सरकारच्या वतीने चालवावा. सरकारच्या वतीने उच्च तज्ञ वकिलाच्या माध्यमातून न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून न्यायालयात बाजू मांडावी. पीडित कुटुंबाचे पुनर्वसन करून शासकीय सेवेत सामावून घ्यावे अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येण्याचा लेखी इशारा मानवहित लोकशाही पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवराज दाढेल लोहेकर यांनी दिला आहे.