स्काऊट आणि गाईडचे मुख्य आश्रयदाते म्हणून राज्यपालांचे पदग्रहण

मुंबई : प्रतिनिधी

स्काऊट आणि गाईड हे सामाजिक सेवेसाठी समर्पित कार्य आहे. ही निस्वार्थ सेवा असल्याने या कामात एक आत्मिक सुख प्राप्त होते. त्यामुळे स्काऊट आणि गाईडचा मुख्य आश्रयदाता म्हणून पद ग्रहण करणे हा माझाच सन्मान असल्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले.

राजभवन येथे मंगळवारी महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड संस्थेचे महाराष्ट्राचे मुख्य आश्रयदाते म्हणून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पदग्रहण केले. यावेळी राज्यपालांनी स्काऊट प्रतिज्ञा घेतली. स्काऊट गाईडचे मुख्य आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांनी राज्यपालांना मानचिन्ह आणि स्कार्फ प्रदान केला.

या कार्यक्रमास मा. राज्य मुख्य आयुक्त आदरणीय बकोरिया साहेब. सह संचालक श्री व्यंकेश्वर आनंद सर राज्य चिटणीस श्री महाडिक सर, क्रिडा अधिकारी श्री फडतरे सर, STC (G) श्रीमती किशोरी शिरकर STC (S) श्री गिरीश कांबळे, SOC S&G श्री जामकर आणि श्रीमती सरिता पाटील, लीडर ट्रेनर (गा) श्रीमती Jasmeen Mistry नवल महाडिक, अक्षय तांबे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *