ह.गो.नारलावार
बालभारती अभ्यास मंडळ सदस्य तथा प्रसिद्ध गणितज्ञ माननीय श्री हरी गोविंद नारलावर यांची आज दिनांक 15 डिसेंबर रोजी भेट झाली. निमित्त होते त्यांच्या मुलगा तथा माझे मित्र आनंत नारलावार यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठीच्या अनुषंगाने त्यांच्या घरी गेलो असता सहजच श्री ह.गो. नारलावार ( मोठ्या नारलावार सरांची) या व्यक्तिमत्त्वाची भेट झाली.यावेळी माझ्या सोबत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे कंधार तालुकाध्यक्ष मिर्झा जमिर बेग,पत्रकार ए.एल.सरवरी,वाघमारे डी.जी.यांची यावेळी उपस्थिती होती.
सहजच बोलते झालेल्या सरांनी तुम्हीच का साजीद सर असा उच्चार केला आणि मी सहजच त्यांच्या समोर नतमस्तक झालो. जवळपास दहा ते पंधरा मिनिटे चर्चा झाली.
पंधरा मिनिटे कधी संपले हे समजलेच नाही.सर बोलत राहावेत असे वाटत होते. साधारणपणे जेमतेम वेळामध्ये सरांनी आपल्या जीवनातील अमूल्य असे अनुभवाचे कथन केले.
मराठी, गणित आणि अन्य विषय याबाबत प्रचंड विद्वता त्यांच्या अमोघ वाणीतून प्रकट होत होती. सेकंदात गणिताचे सूत्र ,प्रेमियम, पूर्वीचा अभ्यासक्रम व गणित विषयाचे बदलते स्वरूप ,विज्ञानाचे महत्त्व आणि दररोज होत असलेले बदल यावर सर बोलत होते आणि आम्ही ऐकत होतो.
सरांचे बोलणे संपूच नये असे मला वाटत होते , त्यांचा अखंड असणारा अभ्यास, प्रभावी शब्दफेक आणि समजावून सांगण्याची हातोटी यातून त्यांची तेवढ्या वेळातच मला त्यांची महानता समजली. असे प्रभावी व्यक्तीमत्व आसणारे व प्रचंड विद्वान असणाऱ्या माणसाचा मला काही वेळासाठी सहवास लाभला त्यामध्येच मी धन्य झालो.
सरांनी माझ्या डोक्यावर आशीर्वाद रुपी हात ठेवला व मला धन्य केले. पुन्हा लवकरच सर्वांना भेटण्याची इच्छा लागली .सर खूप खूप धन्यवाद आजचा माझा दिवस आनंदी करण्यासाठी …
आतापण सराचे बोलणे ,त्यांचे शब्द व आनुभवाचे साऊण्ड ध्वनी कानात गुंजत आहेत.मनाला प्रचंड आनंद झाला.निश्चितपणे आजचा दिवस माझ्यासाठी हजारो पुस्तके वाचुन मिळवलेल्या ज्ञानापेक्षा अधिकचा वाटला.
पुन्हा एकदा सरांशी संवाद साधण्याचा लवकर योग यावा असे मनात इच्छा झाली.
Sajid sir
संचालक
Sajid Neet Foundation centre kandhar,
Science institute Loha