उमरी : प्रतिनिधी
अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाने समाज संघटनेसाठी नांदेड जिल्हा युवती संघटनेची स्थापना करून संपदा राजेश कुलकर्णी हिची निवड समाज संघटनेसाठी निश्चित फलदायी ठरणारी आहे. असे प्रतिपादन
व्हीपीके उद्योग समुहाचे प्रमुख तथा उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी
यांनी व्यक्त केली.
व्हीपीके उद्योग समुहाच्या वतीने संपदा कुलकर्णी हिची अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ नांदेड जिल्ह्याच्या युवती आघाडीच्या
जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व सुप्रिया सुभाष अंनतवार हिची बीएएमएससाठी निवड झाल्याबद्दल कवळे गुरुजी यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला. या वेळी आनंदराव पाटील भायेगावकर, राजेश
कुलकर्णी, प्रल्हाद हिवराळे, किशोर गव्हाणे, सोनकांबळे गुरूजी आदी
उपस्थित होते. आभार आनंद चव्हाण यांनी मानले.