लोहा /प्रतिनिधी
शिवसेनेचे नांदेड जिल्ह्याचे नेते व हिंगोली मतदार संघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय खा.हेमंत भाऊ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लोहयात युवा सेनेच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना व पालावरील नागरिकांना फळे वाटप करण्यात आले.
शिवसेनेच्या धोरणा प्रमाणे ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हे ध्येय धोरण राबवून शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तळागळात पोहचविण्याचे काम खा. हेमंत भाऊ पाटील यांनी केले. शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असलेले नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील गोरगरीब जनतेची शेतकऱ्यांची सेवा करणारे शिवसेना कार्यकर्त्यांच्या मदतीला धावून येणारे खा.. हेमंत भाऊ पाटील यांना निरोगी व दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा युवा सेनेचे लोहा शहर प्रमुख गजानन कराडे (गुंठे) यांनी व्यक्त करून लोहा येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना व पालावरील नागरिकांना युवा सेनेच्या वतीने फळे व बिस्किट पुडे वाटप करण्यात आले.
यावेळी युवा सेनेचे लोहा शहर प्रमुख गजानन कराडे (गुंठे) , सोमनाथ शिराळे, अर्जुन महाबळे, छगन हटकर, सुहास कोटलवार, सचीन बनसोडे,नागेश पलेवाड, श्रीकांत चव्हाण,अक्षय राठोड,अजिस शेख, तोफीक बागवान, यांच्या सहीत मोठ्या प्रमाणात युवा सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.