बारुळ ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील कंधार ते बारूळ ते नरसी या या राज्य महामार्गावरील धोकादायक खड्डे बुजवण्याचे काम मागील आठ दिवसापासून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू करण्यात आले आहे यामुळे वाहन चालक व प्रवासात आत समाधान व्यक्त होत आहे.
कंधार ते बारूळ या राज्य महामार्ग रस्ता गेल्या अनेक वर्षापासून धोकादायक खड्डे पडले होते हे खड्डे चुकवताना नागरिक व वाहनचालकाच्या अक्षर च्या नाकीनऊ आले होते कंधार ते बारूळ मार्गे जाणारा नरसी हा रस्ता राज्य मार्ग असला तरी या रस्त्यांमधून राष्ट्रीय महामार्ग ही जात आहे केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी या या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन रस्त्याचे लवकरच काम करणार असल्याचे आश्वासन लोहा येथे देण्यात आले होते परंतु एक वर्षे उलटला तरी या रस्त्याच्या राष्ट्रीय महामार्गाला आडकाठी कुठे आली असा प्रश्न नागरिकांना पडला आहे कवठा बारूळ काटकळंबा हळदा चिखली बाचोटी मंगल सांगवी धर्मापुरी चिंचोली वरवंड राहते वसंतवाडी आवळा नंदनवन दहिकळंबा यासह जवळपास पन्नास ते साठ गावांना तालुक्यासाठी जाण्या-येण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होतो तसेच हा रस्ता लातूर प्रवासासाठी हैदराबादला जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग असून परंतु या रस्त्यासाठी नुसती आश्वासन मागील अनेक वर्षापासून देण्यात आली आहे .
त्यामुळे या रस्त्याचे पूर्णता डांबरीकरण अजूनही झाले नाही मागील पंधरा वर्षापासून डागडुजीचे काम होत आहे त्यावर करोडो रुपये आतापर्यंत खर्च ही झाला परंतु सध्याचे रस्त्यांची अवस्था जैसे थे झाली आहे हा रस्ता पंधरा किलोमीटरचा असला तरी त्याला जाण्यासाठी तब्बल दीड ते दोन तासाचा अंतर कापावा लागत आहे.
सध्या डागडुजीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे त्यामुळे हजारो नागरिकांना प्रवाशांना वाहनचालकांना दुधावरची भूक ताकावर काढण्यात आली आहे त्यामुळे थोडासा का दिलासा आहे दिवसापुरता असणार तालुक्यातील राज्य मार्ग खड्डेमुक्त होत असल्याचे दिसत आहेत परंतु नागरिकांची मागणी डांबरीकरणाची आहे.