शेतात काम करणाऱ्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला;पाच जण जखमी १३जणां विरुद्ध अट्रॉसिटी ; लोहा शहरातील घटना

लोह्यातील प्रमुख कार्यकर्ते व पोलिसांच्या संयमी भूमिकेमुळे सामाजिक तणाव निवळला

लोहा ; विलास सावळे


शेतात बोअर पडला त्यात विद्युत मोटार टाकण्यासाठी साहित्य घेऊन जात असताना त्यांच्याच शेताच्या वाटेवर दारू पित बसलेल्या पोलेवाडीतील टोलक्याने बाजूला सारका ..कस काय म्हणालास यावरून वादावादी केली व पोले गावातील लोकांना बोलावून जातीवाचक शिवीगाळ व प्राणघातक हल्ला जोंधळे कुटुंबियांवर केला यात पाच जण जखमी झाले आहेत ही घटना शुक्रवारी सायंकाळी लोहा शहरातील आयटीआय च्या परिसरात घडली याप्रकरणी रात्री उशिरा लोहा पोलिसांत अट्रोसिटी व कलम ३०७
भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे गेल्या काही महिन्यांपासून या वाडी गावातील टोळक्याने उच्छाद घातला आहे.शहरात मारामारी करून हे फरार होत आहेत त्यामुळे सामाजिक एकोपा बिघडत चालला आहे

जुन्या शहरातील विजय इरबाजी  जोंधळे, मधुकर इरबाजी जोंधळे हे शासकीय गोदामात काम करतात. आयटीआय लगतच्या माळावर त्यांनी गायरान मालकीची जमीन आहे मागील तीन दिवसा पूर्वी या भावंडांनी आपल्या कष्टाच्या कामातून पैसे जमा केले व बोअर पडला त्याला खूप पाणी लागले 

शुक्रवारी मधुकर इरबाजी जोंधळे ( वय ४५), त्यांचा जावई मंगेश विजय पंडित(वय 32), सोहन मधुकर जोंधळे,(वय २१) पवन मधुकर जोंधळे,( वय १७) व स्वतः फिर्यादी धीरज विजय जोंधळे (वय २५)आपल्या शेतात मोटार टाकण्याचे काम करत होते.
पोलेवाडीत बाळू मामांच्या मेंढ्या चा समारोप होता वाजत गाजत डीजे लावून या मेंढ्या बेरळीकडे गेल्या.आरोपीतील काही जण जोंधळे यांच्या शेतात जाणाऱ्या रस्तात दारू पित बसले यांनी भाऊ बाजूला सरका.. समान नेत आहोत लागेल ..असे सांगितले पण दारूच्या नशेत असलेल्यानी मंगेश, व पवन
यांच्याशी हुज्जत घातली आणि पोले वाडीत फोन करून तरुणांना फोन करून बोलावून घेतले.


दता बाजगिर, संदीप बाजगिर, धीरज हाके, वैभव हाके , कमलाकर बाजगिर व इतर सात आठ जण यांनी शेतात काम करणाऱ्या या जोंधळे कुटुंबियांना लोखंडी गजाळी,लाकडी काढ्या फायटर ,दगड धोंड्यानी डोक्यात पाठीत व गुप्तांगावर बेदम मारहाण केली यात मंगेशला एका झुडपातडात फेकून दिले अर्ध्या तासाहून अधिक काळ या टोळक्यानी जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला विजय जोंधळे यांनी फोनवरून कळताच ते घटनास्थळी धावले पोलिसांना पाचारण केले व मारेकरी फरार झाले असे फिर्यादी धीरज जोंधळे यांनी सांगितले या हाणामारीत मधुकर जोंधळे त्यांचे मुले भाचा व जावई मंगेश व धीरज याना बेदम मारहाण झाली या पाचही जण जखमी झाले .

रुग्णालयात उपचार करण्यात आले ही घटना कळताच शहरातील मोठा जमाव जमला होता .डीवायएसपी किशोर कांबळे , पोलीस निरीक्षक भागवत जायभाये, पोलीस उपनिरीक्षक एम जी सोनकांबळे व शहरातील प्रमुख कार्यकर्ते यांनी संयमाची भूमिका घेतली सर्व मतभेद विसरून गावातील सर्व जातीधर्माचे कार्यकर्त्यांनी सामाजिक एकोपा बिघडविणाऱ्या लोकांना एकत्रित येत जणू संदेशच दिला .सर्वांच्या संयमी भूमिकेमुळे जमाव शांत झाला त्यामुळे सामाजिक तणाव निवळला डीवायएसपी किशोर कांबळे यांनी रात्रीच घटनास्थळी व रुग्णालयात जाऊ पाहणी केली व तपासाच्या सूचना दिल्या


लोह्यात जुनी पण नव्याने सुरू झालेल्या वाईन मार्ट परिसरात सतत हाणामारी होत असून लोह्यचे सामाजिक वातावरण दूषित होत आहे
फिर्यादी धीरज जोंधळे( वय २५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी दत्ता बाजगीर, संदीप बाजगीर, कमलाकर बाजगिर ,धिरज हाके ,वैभव हाके व इतर सात ते आठ जणा विरुद्ध .कलम भदवि ३०७, ( जीवे मारण्याचा प्रयत्न )१४३,१४७,१४८,१४९,३२४,३२३,५०४, या अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा कलम
३ (१) (r) (s) 3 ( 2)( 5) (अ) १९८९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून तपास डीवायएसपी किशोर कांबळे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *