लोहा ; प्रतिनिधी
-साठेनगर ता. बिलोली जि.नांदेड येथील मातंग सामाजातील मुकबधीर निराधार आनाथ महिला सुनिता कुडके या 26 वर्षीय महिलेवर दि-09/डिसेंबर 2020 रोजी अमारूष आत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली.हि निदंनीय घटना पुरोगामी महाराष्ट्राला कळीमा फासणारी आहे,महाराष्ट्रात वांरवार मातंग समाजावर आन्याय आत्याचार सातत्याने होत आहेत,या घटनेतील आरोपी ला फाशीची शिक्षा झाली पाहिजे,आणि या हत्याकांड प्रकरणी पिडीत कुटुंब यांना न्याय मिळाला पाहीजे या साठी निंदनीय घटनेचा नांदेड जिल्ह्यातील व संबंध महाराष्ट्रातील मातंग समाज हा प्रत्येक स्थरातुन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पध्दतीने निषेध व्यक्त करत आहे,
त्याचाच एक भाग म्हणुन या हत्याकांडच्या निषेधार्थ व निषेध महामोर्चा संयोजन समितीच्या वतीने विराट निषेध महामोर्चा यांच्या वतिने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर दि-21 डिसेंबर 2020 रोजी विराट निषेध महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी नांदेड जिल्ह्यातील सकल मातंग समाजाने लाखोंच्या संख्येने या विराट निषेध महामोर्चात सहभागी व्हावे अशे आहवान करण्यात येत आहे.