कंधार ; प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील मौजे भोजुचीवाडी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. सरपंच, उपसरपंच सर्व सन्माननीय सदस्य यांची दिनांक 20 रोजी गावकऱ्यांनी निवड केली, येथील तरुण गुरुजी तथा सामाजिक कार्यकर्ते सतीश देवकते यांची बिनविरोध सरपंच म्हणून निवड केली आहे.
तसेच उपसरपंच व सदस्यांची निवड केली आहे. यावेळी सतीश देवकते यांनी मी माझ्या या संधीचे सोने करून भोजूचीवाडी ग्रामपंचायत महाराष्ट्रात आदर्श ग्रामपंचायत बनवेल असा विश्वास गावकऱ्यांना दिला.तसेच गेल्या 35 वर्षापासुन ची विनविरोध काढण्याची परंपरा माझ्या रुपाने पुढे चालु असल्याचा आनंदही यावेळी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की 2020 मध्ये आमच्या गावचे निवडणूक होती या निवडणुकीत अगोदर आमच्या गावातील सर्व सन्माननीय सदस्य महिला वर्ग व युवक मित्र यांनी माझ्यावर विश्वास दर्शवून माझी व माझ्या सहकार्याची मित्रांची बिनविरोध निवड केली .
त्याबद्दल गावातील तमाम मित्राची गावकऱ्यांचे मी आभार व्यक्त करून ही सेवा करण्याची मला संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करेल तसेच गावातील दीनदुबळ्यांची सेवा अखंड करेल अशी प्रतिक्रिया युगसाक्षी लाईव्हशी बोलताना दिली.
तसेच येणार्या काळामध्ये ही ग्रामपंचायत महाराष्ट्रामध्ये आदर्श करेल असा विश्वास यावेळी सतीश देवकते यांनी व्यक्त केला आहे.