कंधार ; प्रतिनिधी
मिनी पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री श्रेत्र उमरज संस्थान चे मठाधिपती महंत श्री गुरुवर्य एकनाथ महाराज उमरजकर यांची दि.२१ रोजी जि.प.सदस्या तथा भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी भेट देवून आशिर्वाद घेतला.
यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष चित्ररेखा गोरे ,तालुकाध्यक्ष भगवान राठोड, नगरसेविका अनिता कदम,वंदना डुमणे, राजहंस शहापुरे ,मधुकर डांगे,नवनाथ पाटील तोरणे, प्रभाकर कदम ,बालाजी पाटील तोरणे,श्याम शिंदे,रजत शहापुरे आदीची यावेळी उपस्थिती होती.