लोहा ; विलास सावळे
जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे तात्काळ बुजवा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते राम पाटील पवार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पुढे असे नमूद केली की लोहा शहरातून जाणारा नांदेड- लातूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर गेल्या अनेक दिवसापासून खड्डेच खड्डे पडले आहेत रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे तसेच धुळीचा नाहक त्रास नागरिकांना, व्यांपाराना ,सहन करावा लागत आहे कुंभकर्ण झोपेत असलेले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी तात्काळ जागे व्हावे लोहा शहरातील जाणारा राष्ट्रीय महामार्गवरील खड्डे तात्काळ बुजवावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते राम पाटील पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात दिला आहे.