23 डिसेंबर भारतीय किसान दिवस…

आपल्या भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांचा वाढदिवस २३डिसेंबर हा राष्ट्रीय शेतकरी दिवस म्हणून साजरा केला जातो.शेतकरी राजा हा आपला अन्नदाता मायबाप आहे.शेतक-याच्या हितासाठी चौधरी चरण सिंग यांनी हिताची आणि भरीव कामगीरी केली.त्यामूळे २००१पासून त्यांचा जन्मदिवस”राष्ट्रीय शेतकरी दिवस”म्हणून साजरा केला जातो.


शेती हा व्यसाय फार पुरातन काळापासून चालत आलेला आहे.तिचा उगम अदिमानवाच्या विचारातून आणि स्त्रियांच्या लागवडतंत्रातून झाला आहे.भारतातील जास्तीजास्त लोक हे शेती व्यवसाय करतात.म्हणूनच भारताला “कृषी प्रधान देश” म्हणून ओळखले जाते. भारत देशाचा भूमिपूत्र,रखरखत्या उन्हात कष्टाचे सोने करतो.देशाचा आर्थिककणा मानला जाणारा शेतकरी राजा मात्र कायमस्वरुपी आर्थिकविंवचनेत जीवन व्यतीत करतो.हे आपल्या भारतदेशाचे दुर्भाग्य आहे.कर्ज,नापिक,दुष्काळ,व्यसनाधिनता,अंधश्रध्दा या समस्येमूळे तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे.

राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या निम्मिताने शेतक-याची आर्थिक उंची वाढवण्यासाठी शेतक-याची आर्थिक उंची वाढवण्यासाठी शेतीच्या पारंपारीक पध्दतीत बदल सुचवून तो आमलात आणण्याचा प्रयत्न करावा.

“बियांबरोबर अंत:करण,कुणबी माझा पेरितो
रात्रदिन मेहतीन,शेतशिवार फुलवितो”

खरच….शेतकरी शेती व्यवसाय करतांना बियाबरोबर स्वता:च काळीजही काळ्या मातीत पेरतो,म्हणूनच तर तो त्याला जीवापाड जपत सर्वस्व पणाला लावतो.त्यावेळी त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो.ओला दुष्काळ,कोरडा दुष्काळ, आणि विशेष म्हणजे सतत बाजारभावात होत जाणारी घसरण.घरसंसार सांभाळत तो शेतीसाठी स्वता:ला गहाण ठेवायलाही माघे पूढे पाहात नाही.असा माझा शेतकरीराजा खुपच दिलदार आणि हळव्या मनाचा असतो.आसा हा शेतकरी बांधव रात्रदिवस शेतात राबतो,त्यांच्यामूळेच आपण जगतो,त्याने जर शेती करणे सोडले तर कुणालाच पोटभर अन्न खाण्यास मीळणार नाही.म्हणूनच प्रत्येक भारतीयांच्या मनात शेतकरी राजांविषयी आदराची आपूलकीची भावना असते….म्हणूनतर प्रत्येकाच्या ओठावर”शेतकरी सुखी तर देश सुखी”जिथे राबती हाथ तेथे हरी”ही म्हण असते.”जय जवान,जय किसान”म्हणतांना आपला उर अभिमानाने भरुन येतो.अपार कष्ट करुन जनतेच्या पोटापाण्याचा प्रश्न तो मिटवतो.पण…स्वता:मात्र सुखाच्या दोनघासाठी तो तरसतो,शेतक-याच्या कर्दकाळ ठरणा-या राजकीय व्यवस्थेने मात्र कायम त्यांचे भांडवल करुन आपले घर भरले आहे.खर तर शेतक-यांच्या समस्या जाणून त्यावर लवकरात लवकर उपाय योजना करण्यासाठी प्रत्येक राजकीय नेत्यांनी कटिबध्द असावे…तरच शेतक-याच्या अडचणी ताबडतोब सोडविण्यास मदत होईल.


भारतातील शेतकरी हा जागतिककीकरणानंतर आधुनिक शेतीकडे थोड्याफार प्रमाणात वळला आहे.साहाजीकच त्याचा फायदा त्याला होत आहे.आजच्या दिवशी शेतकरी राजा विषयी कृतज्ञता व्यक्त करुन त्याचा गौरव करुया.शेतक-याविषयी कायम सहानुभूती आणि आत्मियता असू द्या.

“भारतीय किसान दिवसाच्या समस्त शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा”

शहिद हो रहा सीमा पर जवान
और खेतो में किसान
कैसे कह दूँ इस दुखी मन सें
कि मेरा भारतदेश महान….?

rupali wagre vaidh

रुपाली वागरे/वैद्य
नांदेड.
९८६०२७६२४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *