फुलवळ -आंबूलगा राज्य महामार्गावर कार – मोटारसायकल चा अपघात..एक ठार

अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार , कार चालक ? पसार.

फुलवळ ; (धोंडीबा बोरगावे)

कंधार तालुक्यातील फुलवळ मार्गे मुखेड जाणाऱ्या राज्य महामार्गावर फुलवळ ते आंबूलगा दरम्यान आज दुपारी कार क्र.MH १४ , HU ५७८५ आणि मोटारसायकल क्र. MH २४, AZ ९९७१ या दोन वाहनांची समोरासमोर जबरदस्त धडक झाली आणि त्यात मोटारसायकल चालक संदीप बालाजीराव येरकलवाड वय ३० वर्षे रा.मुखेड वडार गल्ली हा जागीच ठार झाला असून कार चालक घटनास्थळावरून केंव्हाच पसार झाल्याचे निदर्शनास आले.

अधिक माहिती अशी की , सदर कार ही आंबूलगा वरून कंधार कडे जात होती , त्यात एकटा चालकच असल्याचे सांगितले गेले तर मोटारसायकल ही कंधार वरून मुखेड कडे जात होती आणि त्या मोटारसायकलवर ही चालक हा एकटाच होता.

फुलवळ अंतर्गत असलेल्या केवळानाईक तांडा ते आंबूलगा च्या दरम्यान असलेल्या राज्य महामार्ग वर वळणाच्या ठिकाणी उतरती असल्याने आणि वळण असल्याने सदर दोन्ही वाहन हे भरधाव वेगाने असावेत त्यातच या दोघांची ही समोरासमोर धडक होतहोता कारच्या चालक बाजूला मोटारसायकलस्वार हा जोराने आढळून जवळपास १०० मीटर अंतरावर जाऊन कोसळला आणि डांबरीकरण चा रस्ता असल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे तो जागीच ठार झाला. तर कार चालक हा घटनास्थळी अन्य कोणी येण्याअगोदारच तेथून पसार झाला असल्याचे उपस्थित नागरिकांनी सांगितले.

आंबूलगा चे पोलीस पाटील फुलारी व बिट जमादार गोंटे व त्यांचे सहाय्यक पो. कॉ .सय्यद हे घटनास्थळी पोहचून स्थळ पंचनामा केला आणि मयताचे प्रेत शवविच्छेदनासाठी कंधार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बिट जमादार गोंटे व पो. कॉ. सय्यद हे पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *