कै.सगणे जलतरणिका त्वरीत सुरु करण्याची मनपा आयुक्तांना मागणी

नांदेड ; प्रतिनिधी

कै.सगणे जलतरणिका त्वरीत सुरु करणे तसेच श्रीराम सेतुपुल, गोवर्धनघाट येथे नियमित स्वच्छता ठेवून रस्त्यावरील बंद दिवे सुरू करण्याची मागणी मनपा आयुक्त सुनील लहाने यांच्याकडे भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले, विरोधी पक्षनेते; दीपकसिंह रावत आणि एन्जॉय स्विमिंग ग्रुपचे सचिव धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील जलतरणपटूच्या शिष्टमंडळाने केली.

शिष्टमंडळात माजी नगरसेवक मिलिंद देशमुख, पावडेवाडीचे सरपंच बंडू देशमुख, भाजपा सरचिटणीस व्यंकट मोकले, जिल्हा उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी, जिल्हा उपाध्यक्ष प्रतापराव पावडे, जिल्हा चिटणीस मनोज जाधव, माजी नगरसेवक व्यंकटेश जिंदम, सोशल मीडिया संयोजक राज यादव, सरदार रवींद्रसिंघ पुजारी, भाजपा युवती अध्यक्षा महादेवी मठपती यांच्यासह अनेक क्रीडाप्रेमी  नागरिक उपस्थित होते. आयुक्तांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,गेल्या दिड वर्षापासून कै.सगणे जलतरणिका बंद असल्यामुळे अनेक राज्यस्तरीय जलतरणपटूंचा सराव होत नाही. त्यामुळे त्यांच्या ‍क्रिडा कार्यकिर्दीवर विपरीत परिणाम होत आहे. तसेच जलतरणिका बंद असल्यामुळे मनपाचे आर्थिक उत्पन्न बुडत आहे. सर्व भारतातील जलतरणिका कोविड लॉगडाऊन नंतर सुरु झाल्या तरी देखील नांदेडची जलतरणिका बंद असल्यामुळे जलतरणपटू मध्ये कमालीचे संतापाचे वातावरण पसरले आहे. तरी जलतरणिका त्वरीत सुरु करावी. तसेच श्रीराम सेतुपुल, गोवर्धघाट येथे हिवाळ्यात दररोज सकाळी पाच ते आठ या वेळेत शेकडो स्त्री पुरुष पायी चालतात. या पुलावर कमालीची अस्वच्छता असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे.  या पुलावरील अर्धे स्ट्रीट लाईट बंद आहेत. त्यामुळे स्त्रीया आणि मुलींना त्रास होत आहे. तरी एक दिवसाआड पुलावरील स्वच्छता करण्यासाठी स्वच्छता कर्मचा-यांची नियुक्ती करावी आणि पुलाच्या रस्त्यावरील बंद दिवे त्वरीत सुरु करावे  अशी मागणी करण्यात आली आहे. आयुक्तांनी तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. जलतरणिका  कधी सुरू होते याकडे सर्व जलतरणपटू यांचे लक्ष लागले आहे.

( छाया: करणसिंह बैस)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *