प्रणिताताई देवरे चिखलीकर यांची शिक्षिका प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्य प्रमुखपदी निवड

नांदेड ;प्रतिनिधी

लोकप्रिय नांदेड चे दबंग खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कन्या नांदेड च्या लोकप्रिय
जि.प. सदस्या तथा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष तथा पुणे व औरंगाबाद शहर प्रभारी सौ प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्यावर पक्ष श्रेष्ठींनी पक्षाप्रति असलेली निष्ठा व दिलेली जबाबदारी पार पाडण्याकरिता असलेली क्षमता व जनतेच्या सोबत असलेले आपुलकी चे नाते व प्रामाणिकपणाची दखल घेऊन पक्षाने प्रणिताताई देवरे चिखलीकर यांची  शिक्षिका प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्य प्रमुखपदी निवड करून नवीन जबाबदारी दिली.

सदरील निवडीचे दि.१७ डिसेंबर रोजी महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्या स्वाक्षरी चे नियुक्ती पत्र सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांना देण्यात आले असून महाराष्ट्रात प्रकोष्ठ प्रमुखांची नेमणूक करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

PPC

RRS

BJP_Maharashtra

Umatai_khapare

devendrafadnavisformaharashtra

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *