हक्काचे घरकुल द्या;अन्यथा आत्मदहन करणार- राहुल साळवे

नांदेड: प्रतिनिधी

गत अनेक वर्षांपासून लोकशाही मार्गाने विविध आंदोलने उपोषणे करून हि अद्याप हक्काचे घरकुल आणि रोजगारासाठी जागा तसेच शासकिय अणुषेश भरून न काढल्याच्या निषेधार्थ कमल फाऊंडेशन संचलित बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड कडुन आज दि 22 डिसेंबर 2020 रोजी मनपा आयुक्त डाॅ.सुनिल लहाने यांच्यासह जिल्हा दंडाधिकारी डाॅ.विपीन ईटणकर आणि पोलिस अधिक्षकांसह पोलिस निरीक्षक वजीराबाद यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

या निवेदनात बेरोजगार दिव्यांगांनी म्हटले आहे कि आम्ही नांदेड शहरातील विविध प्रभागात भाड्याच्या खोलीत गत 15 वर्षांपासून किरायाने राहत असुन अनेक वेळा निवेदने देऊन तथा आंदोलने उपोषणे करून हि तसेच प्रत्यक्षात भेटुन हि अद्याप आम्हा बेरोजगार दिव्यांगांना हक्काचे घरकुल मिळाले नाही तसेच स्वंय रोजगारासाठी 200 स्क्वेअर फूट जागा सुद्धा मिळाली नाही यासह आमचा शासकीय अणुषेश सुद्धा पुर्णतः भरून काढण्यात आला नाही परीणामी आम्हा बेरोजगार दिव्यांगांना लोकशाही मार्गाने दि 28 डिसेंबर 2020 रोजी शेवटचे आमरण उपोषण करावे लागत आहे.

कारण याआधी आम्ही बेरोजगार दिव्यांगांनी 68 आंदोलने उपोषणे केली आहेत परंतु आम्हाला आजवर न्याय मिळाला नाही त्यामुळे आम्ही शेवटचेच आमरण उपोषण हे दि 28 डिसेंबर 2020 रोजी महानगरपालिका नांदेड समोर करणार असल्याचे तसेच या उपोषणाला जिल्हा प्रशासनाकडुन दुर्लक्ष केल्यास स्वहस्ते सरणं रचुन ऊपोषणास्थळी स्वताला जाळुन आत्मदहन करणार असल्याचे समीती अध्यक्ष राहुल साळवे यांच्यासह नागनाथ कामजळगे.संजय सोनुले.विठ्ठल सुर्यवंशी.विश्वनाथ हंबर्डे.राजकुमार देवकर.शेख आरिफ.गोविंद बोद्देवाड.भाऊसाहेब टोकलवाड आणि माधव बेर्जे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *