ना नाताळ ना वेताळ!

कोरोनाचं संकट टळलेलं नसताना आता ब्रिटनमध्ये एका नव्या प्रकाराच्या विषाणूची भर पडली आहे. त्यामुळे जगावर आणखी एक संकट ओढवलंय. या विषाणूच्या भीतीनं अनेक देशांनी पुन्हा एकदा निर्बंध लागू केलेत.

वर्ष उलटलं तरी कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही. त्यातच आता ब्रिटनची राजधानी लंडनसह इंग्लंडच्या पूर्व भागात कोरोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग वेगानं फैलाव होतोय. काही दिवसांपूर्वी हा विषाणू आढळला होता. या विषाणुमुळे बाधितांच्या संख्येत वाढ होत असल्यानं सरकारनं लॉकडाउनचे निर्बंध लागू केलेत..त्यापाठोपाठ युरोपीयन देशांसह इतर देशांनीही ब्रिटनमधील विमान सेवेवर बंदी घातलीय. कोरोनाचा हा नवीन प्रकार फक्त ब्रिटनपुरता मर्यादित न राहता इटली, नेदरलँड्स, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेत वेगानं पसरत आहे.

ब्रिटनमध्ये आढळलेला नव्या प्रकारचा करोना विषाणू हा आधीच्या विषाणूपेक्षा ७० टक्के अधिक वेगाने फैलावतो. लंडन आणि दक्षिण इंग्लंडच्या भागात हा विषाणू वेगानं फैलावण्याची भीती व्यक्त होतीय. बाधितांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे रविवारपासून ब्रिटनमध्ये कठोर नियमांसह लॉकडाउन सुरू करण्यात आलंय. त्यामुळे लाखो नागरिकांवर पुन्हा एकदा घरातच थांबवण्याची वेळ आली.

कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, बेल्जियम, ऑस्ट्रिया, चिली, बग्लेरिया आणि दक्षिण अरबकडून ब्रिटनच्या प्रवासावर बंदीची घोषणा केली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे दक्षिण इंग्लंडमधील बाजार ख्रिसमस आधीच बंद करण्याची घोषणा केली आहे. ब्रिटनमध्ये चतुर्थ श्रेणीच्या कडक लॉकडाउनची घोषणा बोरिस जॉन्सन यांनी केली आहे.

नव्या स्ट्रेनमुळे संसर्गाची तीव्रता ७० टक्क्यांनी वाढली
ब्रिटनमध्ये आढळलेला नवीन स्ट्रेन पूर्वीच्या रूपांपेक्षा जास्त संसर्गजन्य असल्याची माहिती वैज्ञानिकांनी दिली. याचा अर्थ असा आहे की नवीन विषाणू पूर्वीच्या विषाणूपेक्षा त्वरीत संसर्ग पसरवतो. लोकांना दिले जात असलेली कोरोनाची लस नवीन स्ट्रेनविरूद्ध लढण्यातदेखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल आणि शरीरावर प्रभावी ठरेल, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा प्रसार झाल्यामुळे ब्रिटन सरकारने नाताळच्या खरेदीसाठी तसंच सण साजरा करण्यावर अनेक निर्बंध घातले आहेत.

ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानं संपूर्ण जग धास्तावलं आहे. यानंतर ब्रिटन आणि युरोपहून येणाऱ्या विमानांची वाहतूक रोखण्याचा निर्णय अनेक देशांनी घेतला आहे. भारत सरकारनंदेखील कालच ब्रिटनमधून येणारी विमानं रोखण्याचा निर्णय घेतला. ही बंदी ३१ डिसेंबरपर्यंत कायम असेल. कोरोनाचा नवा स्ट्रेन जास्त धोकादायक असल्यानं अनेक देशांकडून खबरदारी घेतली जात आहे.

सध्याच्या घडीला जगभरात कोरोना लसीवर संधोधन सुरू आहे. अमेरिकेत कोरोनाचा कहर सुरू असल्यानं काही कंपन्यांच्या लसींच्या वापरास परवानगी देण्यात आली आहे. आणखीही काही देशांनी लसीकरणास सुरुवात केली आहे. एकीकडे जग कोविड-१९ संकटातून बाहेर आलं नसताना आता कोविड-२० ची चर्चा सुरू झाली आहे. ट्विटरवर कोविड-२० ट्रेंडिंग आहे. कोविड-२० हॅशटॅग वापरून आतापर्यंत हजारो ट्विट्स करण्यात आली आहेत.

कोरोनाचा पहिला विषाणू २०१९ मध्ये चीनच्या वुहानमध्ये सापडला. त्यामुळे त्याला कोविड-१९ म्हटलं गेलं. वुहानमधून हा विषाणू आधी चीनमध्ये आणि मग संपूर्ण जगात पसरला. आता ब्रिटनमधून आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या आणि जास्त धोकादायक स्ट्रेननं जगाची चिंता वाढवली आहे. नवा स्ट्रेनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत.

कोणत्याही नव्या विषयावर नेटकऱ्यांनी हॅशटॅग वापरून मोठ्या संख्येनं ट्विट करण्यास सुरुवात केल्यावर तो विषय ट्रेंडिंग ठरतो. अनेक जण मीम्स शेअर करतात. काही जण यातूनही लोकांना सतर्क करण्याचा प्रयत्न करतात. गेल्या काही तासांमध्ये कोविड-२० चा हॅशटॅग वापरून हजारो ट्विट्स केली गेली आहेत. त्यामुळे #Covid-20 ट्रेंडमध्ये आहे.

यावरून कोरोना विषाणूचं वर्तन बदललं आहे असे दिसते आहे.
परंतु अनेकदा हा बदल अर्थहीन असतो तर काही वेळेस विषाणू स्वत:मध्ये असा काही बदल करतो की त्याचं स्वरूप आणखी विनाशकारी होतं. त्यातून आपल्याला संसर्ग होण्याचा धोका वाढतो. त्याची त्रास देण्याची क्षमता म्हणजे आपल्याला बाधित करण्याची क्षमता वाढणं हे विषाणूसाठी विजयी होण्यासारखं आहे. कोरोना विषाणूचा एक आणखी प्रकार विकसित झाला आहे का? याचे काही ठोस पुरावे नाहीत. आग्नेय इंग्लंडमध्ये अशी शक्यता वर्तवली गेली आहे. माणसांना आणखी सहजतेने तो संक्रमित करू शकतो. नव्याने विकसित झालेला कोरोना विषाणू माणसाच्या शरीरात शिरल्यास आणखी गंभीर लक्षणं दिसतात. या विषाणूच्या ताकदीपुढे लसही प्रभावहीन ठरू शकते. शास्त्रज्ञांचं दोन गोष्टींकडे काटेकोर लक्ष आहे. कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे अशा ठिकाणी कोरोना विषाणूची पातळी वाढते आहे.

हा धोक्याचा इशारा आहे मात्र याचे दोन अर्थ असू शकतात. विषाणूची अंतर्गत संरचना बदलली आहे जेणेकरून कमीत कमी वेळात माणूस संक्रमित होईल. विषाणू योग्य वेळी योग्य व्यक्तींच्या शरीरात गेला तर त्याचा मुक्त संचार सुरू होतो. उन्हाळ्यात सुट्टीवर असताना लोकांना त्याची लागण झाली. घरी परतताना ते संक्रमित झाले. याला स्पॅनिश स्ट्रेन म्हटलं गेलं. प्रयोगशाळेतल्या प्रयोगांनंतर हे स्पष्ट होऊ शकेल की कोरोना विषाणूचा हा नवा प्रकार मूळ विषाणूइतकाच घातक आहे का त्यापेक्षा अधिक संसर्ग घडवू शकतो.

विषाणूची संरचना कशी बदलली हे वैज्ञानिकांनाही कोड्यात टाकणारं आहे. कोरोना विषाणूत सातत्याने बदल होत आहेत. आम्ही अपेक्षा केली होती त्यापेक्षाही बरेच जास्त. काही बदल अनोखे आहेत, असं आता सिद्ध झाले आहे.

कोरोना विषाणूच्या परिवर्तनाचे दोन प्रकार आढळून आले आहेत. विषाणूंमध्ये दोन प्रकारे जनुकीय बदल होतात. त्यांच्या अवघड नावांमुळे मी तुमची माफीच मागायला हवी. हे दोन्ही जनुकीय बदल कोरोना विषाणूवरच्या वर आलेल्या म्हणजेच स्पाईक्समधल्या प्रथिनांमध्ये आढळतात.

याच्या सहाय्याने हा विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो आणि मानवी पेशींवर ताबा मिळवतो. हा जनुकीय बदल N 501 यामुळे कोरोनाच्या स्पाईक्सच्या महत्त्वाच्या भागात बदल होतो. याला रिसेप्ट बाईडींग डोमेन म्हणतात. इथे पहिल्यांदा आपल्या शरीराच्या पेशींच्या पृष्ठभागावर सगळ्यात आधी संपर्क येतो.
हा संरचना बदल महत्त्वाचा आहे. अन्य संरचना H69/V70 deletion याआधीही अनेकदा निर्माण झालं आहे. नव्या संरचनेच्या कोरोना विषाणूचं आक्रमण रोखण्यात शरीरात निर्माण झालेल्या अँटीबॉडीज कमी पडल्या.

कोरोना विषाणूचं बदललेलं रूप नेमकं कसं आहे हे समजून घेण्यासाठी प्रयोगशाळेत शास्त्रोक्त अभ्यास सुरू आहे.
कोरोना विषाणूची संरचना बदलली आहे, तो विषाणू विकसित झाला आहे हे आम्हाला कळलं आहे मात्र जीवशास्त्रीयदृष्ट्या नेमकं काय बदललं आहे याची कल्पना आलेली नाही,”
याचा किती गंभीर परिणाम होईल किंवा होणार नाही हे आताच सांगणं काहीसं घाईचं ठरणार आहे.

कोरोना विषाणूमध्ये झालेल्या म्युटेशनमुळे लशीच्या परिणामकारकतेबाबत प्रश्न निर्माण झाले. फायझर, मॉडर्ना आणि ऑक्सफर्ड या कंपन्यांच्या लशी कोरोनाच्या स्पाईक्सविरोधात लढण्यासाठी सक्षम बनवण्यात आल्या आहेत. मात्र आपलं शरीर विविध स्वरुपाची आक्रमणं कशी परतावून लावण्यात वाकबगार आहे. त्यामुळे लस या सुधारित स्वरूपाच्या कोरोना विषाणूचा सामना करू शकेल असा विश्वास आरोग्य तज्ज्ञांना वाटतो आहे.

वर्षभरापूर्वी प्राण्यांमध्ये आढळलेले हे विषाणू माणसाच्या शरीरात संक्रमित झाले. तेव्हापासून साधारण महिन्याभरात या विषाणूच्या संरचनेत दोन बदल झाले असल्याचं शास्त्रज्ञांना आढळलं आहे.

सध्याच्या कोरोना विषाणूचा एक नमुना घेऊन आणि वुहानमध्ये पहिल्यांदा सापडलेल्या कोरोना विषाणूच्या स्वरूपाशी या नव्याची तुलना केल्यास. त्या दोघांमध्ये किमान 25 बदल झाल्याचं आढळेल, असा दावा शास्त्रज्ञ करीत आहेत.
कोरोना विषाणू माणसांवर आक्रमण करण्यासाठी विविध पर्याय आजमावतो आहे. कोरोना विषाणूचा आणखी एक प्रकार म्हणजे G614, ज्याची माणसांना संक्रमित करण्याची ताकद वाढती आहे. विषाणू अशा पद्धतीने उत्क्रांत होत गेला तर आपल्याला लशींचं नूतनीकरण करावं लागेल.

कोरोनाची लाट आटोक्यात आल्यानंतर ब्रिटेननमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. राज्य सरकारनेही तातडीने विमान सेवा बंद केली आहे. अशातच युकेवरून मुंबईत आलेल्या प्रवाशांबद्दल दिलासादायक वृत्त हाती आले आहे. युकेवरून आलेल्या प्रवाशांमध्ये एकालाही कोरोनाची लागण नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

सोमवारी मुंबईत रात्री आणि आज दिवसभरात मिळून 5 फ्लाईट येणार होत्या. त्यापैकी एक विमान रद्द झाले आहे. त्यांपैकी 3 विमाने आली आहेत. अजून एक विमान हे आज रात्री येणार आहे. सोमवारी रात्रीपासून युकेहून आलेल्या प्रवाशांपैकी एकही पॉझिटिव्ह व्यक्ती सापडलेली नाही, अशी माहिती अतिरीक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी दिली.

तसंच,  या तीन विमानांमध्ये सहाशे प्रवासी आले असून सर्व प्रवाशांना  क्वारंटाइन करण्यात आले आहे. या प्रवाशांची 5 दिवसांनंतर पुन्हा आरटीपीसीआर  टेस्ट करण्यात येणार आहे. पण, सध्या आलेल्या प्रवाशांपैकी कुणीही पॉझिटिव्ह नाही, असंही ककाणी यांनी सांगितले आहे.

‘युकेतून आणि देशांतर्गत प्रवास करणाऱ्या दिल्ली, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश येथून  विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांकडे निगेटिव्ह रिपोर्ट असेल तरच बोर्ड करण्याची परवानगी दिली आहे. युकेहून येणारी विमान सेवा आज रात्रीपासून बंद होणार आहेत. शेवटची एकच फ्लाईट रात्री ११ वाजता येण्याची बाकी आहे. मिडल इस्ट आणि वेस्ट युरोप मधून येणाऱ्या प्रवाशांनाही क्वारंटाइन केले जात आहे, असंही त्यांनी सांगितले.

युकेहून ब्रेक जर्नीसाठी देशांतर्गत प्रवास करुन जे असतील त्यांच्यासाठी त्या त्या राज्यांमधील नियम लागू होतील. दिल्ली, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश येथून  विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांकडे निगेटिव्ह रिपोर्ट असेल तरच बोर्ड करण्याची परवानगी असणार आहे. रिपोर्ट नसल्यास विमानतळावरच टेस्ट केली जाणार आहे, असंही ककाणी यांनी सांगितले.

ब्रिटेनमधून येणाऱ्या विमानांव्यतिरीक्त  इतर युरोप आणि मिडल ईस्ट मधूनही जे प्रवासी येत आहे त्यांना क्वारंटाइन केले जात आहे. या प्रवाशांना सेव्हन हिल्स आणि जिटी हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे.

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा (स्ट्रेन) हाहाकार लक्षात घेऊन खबरदारी म्हणून राज्यात उद्यापासून रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. राज्यात कोरोना आणि कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षावर तातडीची बैठक बोलावली होती. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतीश पाटील आणि शंभूराजे देसाई उपस्थित आहेत. यासोबतच अतिरिक्त सचिव सिताराम कुंटे, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह, कायदा-सुव्यवस्था अतिरिक्त आयुक्त विश्वास नांगरे-पाटील देखील बैठकीला हजर होते.
२५ ते ३१ डिसेंबर या काळातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. कोरोनाचा काळ असताना ख्रिसमस आणि नववर्ष स्वागतासाठी निर्बंध घालण्यात आले आहेतनववर्ष स्वागतासाठी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स संघटनेने मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी सरकारकडे केली होती. मात्र, रात्रीच्या संचारबंदीमुळे सारे बंद राहणार आहे.

२२ डिसेंबर पासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तो ५ जानेवारीपर्यंत ते लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

ब्रिटन मध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत असून या विषाणुची घातकता पुढील काही दिवसात कळेल त्यामुळे आजपासूनच राज्यात यासंदर्भात अधिकची सतर्कता बाळगली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना आजपासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. ज्या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमाने उतरतात तेथील महापालिका आयुक्तांनी अशा प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पीटलची व्यवस्था करावी. त्याचबरोबर युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची देखील व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

अन्य देशांमधून आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्का मारून त्यांना होम क्वारंटाईन केले जाईल. युरोपीयन देश, मध्य-पूर्व देशातून आलेल्या प्रवाशांची तपसाणी करणाऱ्या विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

युरोप आणि मध्य-पूर्व देशातून प्रवास केलेल्यांनी देशांतर्गत विमान प्रवास केला असेल तर त्यांची माहिती त्यांनी देणं गरजेचे असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकची काळजी घेण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्र सरकारने २३ तारखेपासून ब्रिटनहून येणारी विमाने बंद केली आहेत. मात्र, दोन दिवसांत मुंबईत ५ विमाने येणार आहेत. य़ामध्ये अंदाजे १००० प्रवाशी असतील. त्यांच्यासाठी ताज, ट्रायडंट आदी हॉटेलमध्ये २००० रुम बुक करण्यात आले आहेत.

राज्यात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्य़क सेवा सुरु राहतील. मात्र, ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत. मुंबई महापालिकेने तातडीने लंडनहून येणाऱ्या प्रवाशांसाठी तयारी केली आहे. दोन फ्लाईट आज रात्री येणार, दोन उद्या सकाळी आणि एक रात्री ११ वाजता येणार आहे. यामध्ये संशयित प्रवाशांना थेट सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. यासाठी तिथे 100 बेड आरक्षित ठेवण्यात आले आहेत. या प्रवाशांना बेस्ट ट्रान्सपोर्ट करणार आहे.

रात्री ११ पर्यंत कोणताही नियम बदललेला नाही. रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत महापालिका क्षेत्रात निर्बंध. हे नववर्ष साधे नाहीय. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या सेलिब्रेशनवर नियंत्रण ठेवाव लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. परवापासून लंडनहून येणारी विमाने बंद होतील. मात्र, उर्वरीत युरोपमधील देशांमधून विमानवाहतूक सुरुच राहणार आहे. यामुळे या प्रवाशांना सक्तीचे क्वारंटाईन करण्यात येणार आहे. हा लॉकडाऊन नाही, नाईट कर्फ्यू आहे हे लक्षात घ्यायला हवे.

ब्रिटनवरून सोमवारी रात्रीपासून तीन विमाने मुंबईत दाखल झाली आहेत. या विमानांतून ५९० प्रवासी आले आहेत. यापैकी १८७ मुंबईतील असून १६७ राज्याच्या अन्य भागातील आहेत. तर १६७ प्रवाशी महाराष्ट्रबाहेरील आहेत. या प्रवाशांना त्यांच्या घरी जाऊ दिल्याने वाद निर्माण झाला आहे.

राज्याबाहेरील प्रवाशांना त्यांच्या राज्यात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबाबत त्या त्या राज्यातील प्रशासनाला कळविण्यात आले आहे. मात्र काही प्रवाशांना सोडल्यामुळे हॉटेलमध्ये विलगीकरणात असलेल्या काही प्रवाशांनी मंगळवारी हॉटेलमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करीत ठिय्या मांडला.

मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी सोमवारी सायंकाळी सांगितल्यानुसार ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाशांना फाईव्हस्टार व परवडणाऱ्या हॉटेलमध्ये ७ दिवसांचे सक्तीचे क्वारंटाईन केले जाणार होते. तसेच ५ ते ७ दिवसांनंतर त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट केली जाणार होती. याचा संपूर्ण खर्च या प्रवाशांनाच करावा लागणार होता. फक्त हॉटेल निवडण्याची मुभा देण्यात येणार होती. याबाबतची गाईडलाईनही पालिकेने प्रसिद्ध केली होती. मात्र, आता राज्याबाहेरील प्रवाशांना त्यांच्या राज्यात जाण्याची मुभा देण्यात आली आहे. तसेच राज्यातील प्रवाशांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले आहे. यामुळे दुजाभाव होत असल्याने हे प्रवासी नाराज झाले आहेत.

मुंबई महापालिकेने राज्यातील इतर विभागांवर जबाबदारी न टाकता लंडनहून येणाऱ्या प्रवाशांना मुंबईतच क्वारंटाईन करण्याची सोय केली आहे. या प्रवाशांसाठी फाईव्हस्टार हॉटेल बुक करण्यात आली असून या हॉटेलचा खर्च या प्रवाशांनाच करायचा आहे. तसेच त्यांना विमानतळावर उतरल्य़ावर पसंतीनुसार हॉटेल निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. याचबरोबर हे प्रवासी आल्या आल्या त्यांची कोणतीही कोरोना टेस्ट केली जाणार नाही. तर ५ ते ७ दिवसांनी हॉटेलमध्येच त्याची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. या टेस्टचा खर्चही या प्रवाशांनीच करायचा आहे.

या आरटी-पीसीआर टेस्टमध्ये प्रवासी पॉझिटिव्ह आला आणि त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत नसल्यास आणखी ७ दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. अशाप्रकारे १४ दिवसांचे हॉटेलचे बिल या प्रवाशाला भरावे लागणार आहे. तसेच जर त्याची टेस्ट निगेटिव्ह आली तर त्याला घरी सक्तीचे क्वारंटाईन केले जाणार आहे. जर प्रवाशामध्ये विमानतळावर आल्यावर कोरोनाची लक्षणे दिसली तर त्याला थेट सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात येणार आहे.

क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या प्रवाशांसाठी एक हजार खोल्या पंचतारांकित आणि फोर स्टार हाॅटेलमधील तर एक हजार खोल्या बजेट हाॅटेल्समधील असणार आहेत. तसेच बुधवारपासून युरोप खंडातील इतर देशांमधून तसेच मध्य पूर्व आशिया खंडातील देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना महापालिकेच्या केंद्रांमध्ये सात दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येणार आहे.

ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवीन कोरोना विषाणू वेगाने पसरत आहे. या विषाणूची घातकता येणाऱ्या काही दिवसात कळेल. त्यामुळे राज्यात अधिकची सतर्कता बाळगली जात आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे निर्देशही प्रशासनाला देण्यात आले आहेत.”

युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आलं आहे. प्रवाशांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची पाचव्या किंवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल.

ज्या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमानं उतरतात. अशा पालिका आयुक्तांनी प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पिटलची व्यवस्था करावी. त्याचबरोबर युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणं असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात पाच जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू (रात्रीची संचारबंदी) लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दिवसभर अनेक ठिकाणी लोकांची गर्दी होत असताना केवळ रात्रीच्यावेळी संचारबंदी लागू करून सरकारला कोरोनाचा संसर्ग रोखता येणार आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. राज्यात होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर रात्रीच्यावेळी गर्दी होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून राज्य सरकारने संचारबंदी लागू केल्याचे समजतं.

पण बहुतांश लोक रात्री घरी असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी गर्दी होऊ नये म्हणून संचारबंदी लागू करण्यामागे काय ‘लॉजिक’ आहे? असा प्रश्न विचारला जात आहे. तसंच दिवसभरातही अनेक ठिकाणी लोक गर्दी करताना दिसून येत आहेत. तेव्हा दिवसा कोरोनाचा संसर्ग होत नाही का? असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे. शिवाय, रात्रीच्या संचारबंदीत प्रवास आणि पर्यटनाला जाण्याची मुभा असणार आहे का?

कलम १४४ अंतर्गत संचारबंदी (कर्फ्यू) लागू केली जाते. संचारबंदीत नागरिकांना घराबाहेर येण्यास परवानगी नसते. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये संचारबंदी लागू केली जाऊ शकते. संचारबंदीचा नियम मोडल्यास संबंधितांना अटक करण्याचे अधिकार पोलिसांना असतात. संचारबंदीची अंमलबजावणी करण्याचे काम जिल्हा प्रशासन आणि पोलीस करत असतात. संचारबंदीत वैद्यकीय सेवा वगळता बाकी सेवा बंद असतात.

अनलॉकनंतर मुंबईसह राज्यभरात विवाह सोहळे, सार्वजनिक कार्यक्रम, रेल्वे प्रवास, समुद्र किनारे, रेस्टॉरंट्स आणि पब अशा विविध ठिकाणी नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. जवळपास संपूर्ण वर्ष घरात बसलेल्या नागरिकांमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी उत्साह दिसून येत आहे.‌अशावेळी मुंबई, पुण्यासारख्या शहरात विशेषत: तरुणाई रात्री उशिरापर्यंत सेलिब्रेशन करत असते. पण यंदा गर्दीत कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. यामुळेच रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय सरकारने घेतला. पण राज्य सरकार केवळ रात्रीच्या वेळेस संचारबंदी लागू का करत आहे? असा प्रश्न सामान्य जनतेकडून विचारला जात आहे.

दिवसा सर्व काही सुरू असताना रात्रीच्या वेळेस जेव्हा लोक घरी असतात तेव्हा संचारबंदी लागू करून काय साध्य होणार? असे प्रश्न विचारले जात आहेत. दिवसभर लोकांवर नजर ठेवण्यासाठी मुंबई महापालिकेकडे टास्क फोर्स आहे. पण २४ तास हे करणं शक्य नाही म्हणून रात्रीची संचारबंदी लावण्यात आली असल्याची माहिती आहे.

यंदाचा ३१ डिसेंबर दरवर्षीप्रमाणे नाही. त्यामुळे लोकांनी काळजीपूर्वक नियमांचे पालन केले पाहिजे. ख्रिसमससाठी राज्यातील चर्चमध्ये जय्यत तयारी सुरू असताना रात्रीच्या संचारबंदीमुळे चर्चमध्ये रात्री १२ वाजता मास प्रेयर म्हणजेच सामूहिक प्रार्थना करता येणार नाही. मुंबईतील वांद्रे, वसईसहीत राज्यभरातील चर्चमध्ये ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला रात्री १२ वाजता ख्रिश्चन बांधव एकत्र जमतात आणि चर्चमध्ये सामूहिक प्रार्थना केली जाते. या सामूहिक प्रार्थनेला विशेष महत्त्व असतं. पण संचारबंदी रात्री ११ पासून सुरू होत असल्याने १२ वाजता गर्दी करता येणार नाहीय.

राज्य सरकार कोरोनापासून सुरक्षेसाठी काही नियमावली तयार करत आहे. तेव्हा आपण सरकारला सहकार्य केलं पाहिजे असं आमचं मत आहे. ख्रिसमससाठी रात्री १२ वाजता होणारी मास प्रेयर आता रात्री ८ ते १० या वेळेत केली जाईल. रात्री १० नंतर चर्चमध्ये गर्दी नसेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईत एकूण १३२ चर्च आहेत. ख्रिसमसला सकाळी सात ते रात्री सहा वाजेपर्यंत प्रार्थनेसाठी चर्च खुली राहणार आहेत. यावेळी सोशल डिस्टंसिंगचं पालन बंधनकारक असणार आहे. तसंच चर्चमध्ये प्रवेशा करताना मास्क लावणेही अनिवार्य आहे.

राज्यात पाच जानेवारीपर्यंत संचारबंदी असल्याने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी ३१ डिसेंबरला रात्री उशिरापर्यंत करण्यात येणाऱ्या पार्ट्यांवरही आता निर्बंध आले आहेत. मुंबईत शनिवार आणि रविवार शहरात रात्रभर रेस्टॉरंट्स आणि पब सुरू असतात. याठिकाणी ५० लोकांच्या मर्यादेचा नियम पाळला जात नसल्याचं निदर्शनास आलं आहे. म्हणून कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी रात्रीच्या वेळेस संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीत प्रवासावर मात्र कोणतेही निर्बंध घालण्यात आले नाहीत. कारमधून लोक प्रवास करत असतील तर त्यांना रोखण्यात येणार नाही. पण चारपेक्षा अधिक लोकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असं आवाहन करण्यात आले आहे.

ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी अनेकजण बाहेरगावी जाण्याचं नियोजन करतात. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर पर्यटन होत नसले तरी अनलॉकनंतर रेस्टॉरंट आणि रिसॉर्ट्समध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. २५ आणि ३१ डिसेंबरला सेलिब्रेशनसाठी अनेकांनी बाहेरगावी पर्यटनासाठी किंवा रिसॉर्टमध्ये जाण्यासाठी बुकिंग केलं आहे. पण रात्री संचारबंदी लागू केल्याने बुकिंग रद्द करावं लागणार का, अशी शंका नागरिकांच्या मनात आहे.

संचारबंदीत सार्वजनिक ठिकाणी चारपेक्षा अधिक लोकांना गर्दी करता येत नाही. पण इन-डोअर किंवा बंद खोलीत पार्टीसाठी आम्ही एकत्र जमू शकतो का? असाही प्रश्न लोकांच्या मनात आहे. रिसोर्ट किंवा पर्यटनाला जाण्यास मनाई नाही. पण रिसॉर्टमध्ये पार्टी किंवा सेलिब्रेशन रात्री ११ नंतर करता येणार नाही. तरीही रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी जाता येईल. पर्यटनासाठी जायचं असल्यास प्रवास सकाळी सहा ते रात्री अकरापर्यंतच करता येणार आहे, हे मात्र पाळावे लागेल.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात लवकरच जिल्हाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि गृह विभागाशी चर्चा करणार आहेत. अशा परिस्थितीत मात्र ख्रिश्चन धर्मियांसाठी आणि त्यांच्याशी भावनिक सहभागिता दर्शविणाऱ्या लोकांसाठी ना नाताळ तर जिवाची मुंबई करणाऱ्या तसेच हुल्लडबाज थर्टी फर्स्टवाल्या वेताळी आनंद लुटणाऱ्या शौकिनांसाठी ना वेताळ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

गंगाधर ढवळे,नांदेड

संपादकीय
२२.१२.२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *