कंधार – सागर डोंगरजकर
बिलोली जिल्हा नांदेड येथील मूकबधिर मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमास अटक करून तात्काळ फाशी द्यावी अशी मागणी कंधार चे तहसीलदार व्यंकटेश मुंडे कंधार यांना निवेदना द्वारे कंधार भाजपा ने केली आहे.
दि. 9 डिसेंबर रोजी बिलोली जिल्हा नांदेड येथील मूकबधिर मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ढेचून हत्या करन्यात अली होती. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून असे कृत्य करणारे आरोपी अद्याप मोकाट आहेत.
पोलीस प्रशासनच्या वतीने त्यांना तात्काळ अटक करावी ,तसेच जलद गती न्यायालयात हे प्रकरण चालवून त्या नराधमास फाशी द्यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने दि 22 रोजी तहसीलदार व पोलीस निरीक्षक कंधार यांना निवेदना द्वारे करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड,शहराध्यक्ष अँड. गंगाप्रसाद यन्नावार,उपाध्यक्ष तथा नगरसेवक सुनील कांबळे,सरचिटणीस मधुकर डांगे,सरचिटणीस चेतन केंद्रे, उपाध्यक्ष शंतनू कैलासे ,उपाध्यक्ष शिवाजी पाटील लुंगारे, उपाध्यक्ष महेश मोरे,तालुका सोशल मीडिया प्रमुख ॲड.सागर डोंगरजकर ,श्याम शिंदे, शहर सोशल मीडिया रजत शहापुरे,उमेश भुरेवार,माजी नगरसेवक सतीश कांबळे,किशनराव गित्ते,आदीची यावेळी उपस्थिती होती.