लग्नांच्या सप्तपदीलाही कोरोनाचा अडसर कायम ?

सनई चौघड्यांचे मंजुळ सुर कानी गुंजु लागले.

फुलवळ (धोंडीबा बोरगावे)

भारतीय संस्कृतीत असलेल्या १६ संस्कारां पैकी विवाह संस्कार हा सर्वात महत्त्वाचा विधी संस्कार मानला जातो . २७ नोव्हेंबर पासून यावर्षी विवाह मुहूर्त सुरूवात झाल्यामुळे आता विवाह समारंभाचा धूमधडाका उडण्यास सुरुवात झाली आहे.
१८ जुलै २०२१ पर्यंत सुरू राहणाऱ्या लग्नसराईत यंदा तब्बल लग्नाच्या ६२ मुहूर्त आहेत. त्यामुळे शुभमंगल सावधान हे सूर सनई-चौघड्यांच्या स्वरासह आता सर्वत्र गुंजणार आहेत.

तुळशी विवाहाला २६ नोव्हेंबर रोजी संपन्न झाला असून , त्याच्या दुसऱ्याच दिवसापासून म्हणजे २७ नोव्हेंबर पासून लग्नसराईला सुरवात झाली आहे. परंतु खऱ्याअर्थाने लग्नाचा धूमधडाका हा जानेवारी , फेब्रुवारी नंतरच दाट होतो. त्यामुळे यावर्षी कापडबाजार व सराफा बाजार किराणा दुकानदार, बॅंडवाले, कॅटर्स, आचारी, घोडेवाले, प्रवासी वाहने आदींचेही अच्छे दिन देतील की नाही हे मात्र कोरोणा संसर्गामुळे सांगता येत नसल्याचेच चित्र दिसून येत आहेत.
गेली अनेक दिवसापासुन कोरोना ( कोव्हिड – १९ ) च्या महामारीमुळे सततच्या लाॅकडाऊनमुळे उपवर मुला मुलीचे विवाह सोहळे थांबले होते. मात्र आता अनलाॅक प्रक्रिया सुरू झाली असून हिंदू रिती रिवाजानुसार तुळसी विवाह संपन्न झाल्या मुळे आता विवाह करण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे. 


यावर्षी लग्नाचे मुहूर्तही भरपूर आलेले आहेत. त्यामुळे विवाह सोहळे मोठ्या प्रमाणात जुळणार असून , रेश्मीम गाठी बांधल्या जाण्यात येणाऱ्या काळात वाढ होणार आहेत. पण कोव्हिड – १९ कोरोनाची धास्ती मात्र कायम असल्याने, राज्य व जिल्हा प्रशासनाने नियमावली कायम ठेवली आहे. त्यामुळे दिवाळीपासून सुरू होणाऱ्या लग्नांच्या धुमधडाक्याच्या समारंभाला कोरोनाचा अडसर कायम राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहेत.


मंगल कार्यालये विविध कार्यकारी सोसायटीचे सभाग्रह , देवांचे मंदिर आजही माणसांच्या प्रतीक्षेत आहेत.
दिवाळीनंतर दरवर्षी मंगल कार्यालयात धुम धडाधड बुकींग होत होती. यावर्षी मात्र बुकींगचा थांगपत्ताच नाही. लाॅकडाऊन अनलाॅक झाल्यानंतर विवाह खूप मोठ्या प्रमाणात जुळत आहेत. पण हे विवाह शॉर्ट कट घरच्या घरीच आप्त परिवारात उरकविले जात आहे. किंवा अत्यल्प पाहुण्यांना निमंत्रित करून घरासमोरील मोकळ्या जागेत, छोट्याश्या हाॅटेलमध्ये ‘सेलिब्रेशन’ केले जात आहे. काहीजण प्रशासनाच्या नियमानुसार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत एक दिवस लग्न उरकून दुसऱ्या दिवशी घरीच आपल्या जवळील पाहुण्यांना बोलावून जेवणावळी करीत आहेत.

मंगल कार्यालयांना बुकींगची प्रतीक्षा ?

दिवाळीनंतर लग्नाचे मुहूर्त भरपूर आहे आणि लाॅकडाऊनही प्रशासनाने नियम अटी लागू करून थोड्या प्रमाणात शिथिल झाले आहे. त्यामुळे मंगल कार्यालयांमध्ये पटापट बुकींग होण्याची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात काहीही बुकींग होत नसल्याचे मंगल कार्यालय चालकांनी सांगितले. शासनाने उपस्थितीवरील मर्यादा हटविण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे. मात्र कोरोणाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेला पाहून खबरदारीचा उपाय म्हणूण नियमामध्ये शिथिलता देण्यास शासन तयार नाही. नियमाला बांधिल राहून शुंभ कार्य आटोपावे लागत आहे .


सध्या लग्नाचे मुहूर्त भरपूर आहे. मात्र लग्नातील उपस्थितीवर मर्यादा मात्र कायम आहे. त्यामुळे कमी पाहुण्यांसाठी भलेमोठे मंगल कार्यालय बुक करण्यापेक्षा लोक आपल्या टुमदार घरासामोरील जागेत समारंभ करीत आहेत. तेथे छोट्या उपस्थिती करिताच मंगल कार्यालय दिले जात आहे. मंगल कार्यालयमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यांना ‘ईव्हेन्ट’चे स्वरूप दिले जात असल्याने प्रशासनाकडूनही कडक कारवाई होताना दिसत नाही. 

कोरोणाचा धोका अजून कायम ?

शासन कधी निर्णय बदलेल, याबाबत लोकांच्या मनात साशंकता आहे. शासनाने लग्न समारंभात किमान ५० लोकांच्या उपस्थितीला परवानगी दिली पाहिजे असे अनलॉक – ४ च्या नियमावलीत नमुद करण्यात आले आहे . त्यापैक्षा जास्त लोक एकत्र आले तर सरास गुन्हे दाखल केले जात असल्याचे पोलिस प्रशासन सांगते.

परवानगीसाठी पार करावी लागते दिव्यत्वाची कसोटी !

 मंगल कार्यालयासाठी मोठा ॲडव्हान्स वर आणि वधूपित्यांकडून दिला जातो. नवीन नियमांमुळे हा ॲडव्हान्स परत मागितल्यावर  मंगल कार्यालयाचे व्यवस्थापन पैसे परत करत नाहीत.
वधू आणि वर पिता यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिक मंडळींची परवानगी मिळावी, याकरिता चकरा माराव्या लागतात. मात्र नियमांचे उल्लंघन करू नका, असा सल्ला दिला जातो.


आमच्या घरातील भाऊबंदकी ७५ जणांच्यावर आहे. शासनाच्या नियमामुळे ५० लाेकांनाच बोलविता येणार आहे. मंगल कार्यालयात किमान २०० लोकांना तरी परवानगी मिळायला पाहिजे होती. आता कोणाला बोलवावे, कोणाला सोडावे ?हा मोठा प्रश्न वर आणि वधू परिवारा समोर उभा आहे. वर आणि वधू पित्या समोर मोठा पेच उभा झाला असून , यातून मार्ग काढण्यासाठी वधू व वर पित्यानी एक शकल लढवली असून
लग्नप्रसंग आता ऑनलाईन प्रसारित करून नातेवाईक आप्त , मित्र मंडळीना घरी बसूनच नव वधू वराना येणाऱ्या काळात थेट ऑन लाईन आशिर्वाद देता येणार असल्याचे बोलले जात आहे.

आरोग्य व पोलिस प्रशासनाची करंडी नजर

कोरोणाच्या पार्श्वभुमीवर शहरातील अथवा इतर शहरातील लोकाचे नियमा पेक्षा अधिकचे लोकाचे लोंढे शुंभ कार्यासाठी एकत्रीत जमू नयेत ,नियमबाह्य उपस्थिती राहू नये याकडे आरोग्य व पोलिस प्रशासनाचे कटाक्षाने लक्ष ठेऊन आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *