कंधार – प्रतिनिधी
कंधार शहरात मोठया प्रमाणात दुचाकी चोरी चे प्रमाण वाढले असून नागरिक हैराण झाले आहेत,दुचाकी चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी भाजपाचे शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार यांनी निवेदनाद्वारे पोलीस निरीक्षक कंधार यांच्या कडे केली आहे.
गेल्या अनेक दिवसात कंधार शहरात मोठया प्रमाणात दु चाकी चोरी चे प्रमाण वाढले आहे घरां समोर लावलेले वाहन रात्री अपरात्री वाहने चोरी होत आहेत तर शहरात विविध काम निमित्त आलेले नागरिक आपली वाहने विविध कार्यालयात पार्किंग केली असता दिवसा ढवळ्या चोरी जात आहेत अश्या चोरांचा बंदोबस्त करून दु चाकी चोरीस आळा घालावा अशी मागणी पोलीस निरीक्षक कंधार यांच्या कडे दि 22 डिसेंबर रोजी निवेदनाद्वारे केले आहे.
या निवेदनावर
भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड,शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार,उपाध्यक्ष तथा नगरसेवक सुनील कांबळे,सरचिटणीस मधुकर डांगे,सरचिटणीस चेतन केंद्रे, उपाध्यक्ष शंतनू कैलासे उपाध्यक्ष महेश मोरे,शिवाजी पाटील लुंगारे,तालुका सोशल मीडिया प्रमुख अड सागर डोंगरजकार ,श्याम शिंदे, शहर सोशल मीडिया रजत शहापुरे,उमेश भुरेवार,माजी नगरसेवक सतीश कांबळे,किशनराव गित्ते,आदीनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.