नांदेड ; प्रतिनिधी
लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या वतीने गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या ” मायेची ऊब ” या उपक्रमाची सांगता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख यांच्या हस्ते दुर्धर आजारासह जीवन जगणाऱ्या रुग्णांना गरम ब्लॅंकेटचे देऊन करण्यात आली असून आतापर्यंत २०२१ ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली.
विष्णुपुरी येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रास्ताविक विहान चे प्रकल्प संचालक ऋषिकेश कोंडेकर यांनी केले. यावेळी व्यासपीठावर विभाग प्रमुख डॉ. मोरे , डॉ. राठोड मॅडम, उबेद सर, राजेश नागोरिया यादव, डॉ.स्वाती जीवने, डॉ.ज्योती कुलकर्णी, कुलस्वामिनी प्रतिष्ठानच्या सुरेखा लांबे, हेमंत जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना दिलीप ठाकूर यांनी असे सांगितले की, आगामी वर्ष २०२१ असल्यामुळे तितकेच ब्लॅंकेट वाटण्याचा संकल्प ६५ दानशूर नागरिकांच्या मदतीने पूर्ण करण्यात आला.
दररोज मध्यरात्री रस्त्यावर कुडकुडत पडलेले निराधार व असहाय नागरिक, शासकीय रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक, रेल्वे स्थानक व बसस्थानकातील अडकून पडलेले प्रवासी, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, बालगृहातील अनाथ बालके यांचा थंडीपासून बचाव व्हावा या उद्देशाने २०२१ ब्लँकेट वितरित करण्यात आले.
ब्लॅंकेट वितरीत करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या मध्ये संजय अग्रवाल, डॉ.विजय भारतीया,सचिन काकानी , अरूण काबरा, अमोल चक्रावार, किशोर नोमुलवार,मारुती कदम,उमा ओमप्रकाश गट्टाणी, राजेशसिंह ठाकूर, संतोष भारती, दिनेशसिंह कौशिक, ऋषिकेश मैड, रितेश तेहरा, गोविंदराव उत्तरवार,करण जाधव,कैलास महाराज वैष्णव, राहुल तेलंग, दिगंबर रुमणे,आवेस बेग यांनी परिश्रम घेतले.
दरवर्षी मायेचा ऊब उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती लॉयन्स क्लब नांदेड सेंटरतर्फे देण्यात आली आहे.