संभाजीराव मंडगीकर राजकारण आणि समाजकारणातील पितामह –शिवा कांबळे

आदरणीय मंडगीकर काकांची ग्रेट भेट…



नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि गेली आठ दशकापासून समाजाच्या प्रबोधनासाठी, परिवर्तनासाठी आणि सामान्य माणसाच्या भल्यासाठी रात्रीचा दिवस करून सामान्य माणसाच्या कल्याणासाठीचा ध्यास घेऊन अहोरात्र परिश्रमित असलेले आमचे मार्गदर्शक आणि सामाजिक चळवळीतील आमचे पितामह आदरणीय संभाजीराव मंडगीकर साहेब(काका साहेब) हे गेल्या अनेक दिवसापासून आजारी आहेत…..


अनेक दिवसापासून त्यांच्याशी भेटून खूप चर्चा करावी. गप्पा माराव्यात असं मनात होतं. आणि आज ठरवूनच मी आणि माझे सामाजिक चळवळीतील सहकारी सन्माननीय डी.एन. शेळके साहेब आम्ही दोघेजण देगलूर ला मुद्दाम हून मंडगीकर काकांच्या भेटीसाठी आलो. अनेक दिवसांपासून आजारी अवस्थेत असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसत नव्हती. आम्ही खूप वेळ त्यांच्याशी अनेक विषयांवर चर्चा करत असताना त्यांचेही मन मोकळं झालं. आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि प्रसन्नता जाणवली….


काकांच्या चेहऱ्यावरचा प्रचंड आनंद पाहून आम्हीही भारावूनच गेलो होतो. काका अनेक विषयांवर भरभरून बोलत होते. सामाजिक चळवळीत त्यांनी दिलेले योगदान, राजकारणातील खरेपणा आणि खोटेपणा याविषयी आणि समाजाच्या परिवर्तनासाठी आणि प्रबोधनासाठी ही चळवळ कशी गतिमान होता येईल. याविषयी आणि त्यांच्या एकूण साहित्य कलाकृती विषयीही काका भरभरून बोलत होते….


एरवी काकांना भेटायला गेलेल्या प्रत्येकांचा ते सन्मान करत असतात.काही दिवसांपूर्वी मी आणि माझी पत्नी सौ.सुनिता काकांना भेटायला गेलो होतो तेव्हा काका आणि काकूंनी आमचा यथोचित सन्मान केला होता.
आज मात्र आम्ही ठरवून काकांचा सन्मान स्विकारायचा नाही तर आपणच काकांचा यथोचित सन्मान केलोत…..आणि आम्ही काकांचा आशीर्वाद घेतला…..


आज काकांनी समाजकारणातील, राजकारणातील अनेक आठवणी आमच्या समोर उभ्या केल्या. अगदी अंथरुणावर पडलेले काका आम्हाला पाहून उठले, बसले आणि जवळ जवळ दोन तास आमच्या सोबत बोलत राहिले….
अगदी खरेपणाचं….
आपलेपणाचं……
आणि
अगदीच मनातलं…….
आमचा आदर सन्मान राजू दादा मंडगीकर
यांनी केला….
धन्यवाद राजू दादा…..
काका,
आपणास दीर्घायुष्य लाभावे….
अशी प्रार्थना….



■ शिवा कांबळे,नांदेड ■
(राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *