भेंडेवाडी हे कंधार तालुक्यातील तिसरी तर कुरुळा गटातील पहिली बिनविरोध सरपंच निवडीची ग्राम पंचायत ठरली..
फुलवळ ( धोंडीबा बोरगावे )
कंधार तालुक्यात एकानंतर एक ग्राम पंचायत च्या सरपंच पदाची निवड ही बिनविरोध होत असून हे एक सकारात्मक वैचारिक परंपरेचे प्रतीक म्हणून नावारूपाला येत असलेल्या गावांचा इतरांनीही आदर्श घ्यावा असेच म्हणावे लागेल.
यापूर्वी कंधार तालुक्यातील भोजूचीवाडी आणि नवघरवाडी या दोन गावातील मतदारांनी सकारात्मक विचारांची देवाणघेवाण करत आपापल्या ग्राम पंचायत च्या सरपंच पदाची निवड ही बिनविरोध करून दाखवली आहे . त्यातच आज ता. २३ डिसेंबर रोजी याच तालुक्यातील कुरुळा गटातील ५५७ मतदार संख्या व ७ ग्राम पंचायत सदस्य संख्या असलेल्या भेंडेवाडी येथील ग्रामस्थ व मतदारांनी एकत्र येऊन हम कुछ कम नही असे म्हणत आपल्या गावच्या सरपंच पदाची निवड ही सर्वानुमते बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आणि तो सार्थक ही करून दाखवला.
सरपंच पदाचे आरक्षण हे पुरुषाला सुटले तर कंधार पंचायत समिती चे माजी उपसभापती भीमराव जायेभाये हे सरपंच राहतील किंवा आरक्षण महिलेला सुटले तर सरपंच म्हणून त्यांच्या सुविद्य पत्नी सौ सुरेखा भीमराव जायेभाये या राहतील असा सर्वानुमते निर्णय ग्रामस्थ व मतदारांनी घेतला आहे. तर उपसरपंच पदासाठी हणमंत जायेभाये यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर ग्राम पंचायत सदस्य म्हणून सारिका जनार्दन मुंडे, अंगद निवृत्ती जायेभाये , मारोती जायेभाये , हरिबा जायेभाये व सत्रुघ्न मुसळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली
आहे.
या निवडी साठी माजी सरपंच माधव जायेभाये , अंकुश मुसळे व लटपटे सर , बालाजी कागणे , भगवान जायेभाये , बालाजी मुसळे यांच्यासह ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन प्रयत्न करून ही ग्राम पंचायत बिनविरोध केली. त्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन वर्षाव होत आहे.